एक्स्प्लोर
Advertisement
दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचं बक्षीस, भाजप नेत्याचं वक्तव्य
"दीपिका पादुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचे बक्षीस देऊ, आणि त्याच्या कुटुंबाची सर्व व्यवस्था करु," असं वादग्रस्त वक्तव्य हरियाणा भाजप प्रदेश मीडिया संयोजक सूरज पाल अम्मू यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आधीच सिनेनिर्मात्यांकडून स्पेशल मीडिया स्क्रीनिंगमुळे सेन्सॉर बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर टाकावी लागली आहे. त्यातच आता दीपिका पादुकोणला भाजप नेत्याने उघड धमकी दिली आहे.
…तर दीपिका पादूकोणचं नाक कापू : करणी सेना
"दीपिका पादुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचे बक्षीस देऊ, आणि त्याच्या कुटुंबाची सर्व व्यवस्था करु," असं वादग्रस्त वक्तव्य हरियाणा भाजप प्रदेश मीडिया संयोजक सूरज पाल अम्मू यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्ला चढवला आहे.
‘पद्मावती’ला कोणीही रोखू शकणार नाही: दीपिका पादूकोण
मोदींना उद्देशून पाल म्हणाले की, "मतांसाठी राजपूत, मुस्लीमांवर जरब बसवण्यासाठी राजपूत, आणि मतं मिळाल्यानंतर, याच राजपूतांचा अपमान होतोय. यावर मोदी गप्प. मोदीजी! आता तुम्हाला काहीतरी बोललं पाहिजे."
‘पद्मावती’चं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा, फेसबुकवरुन धमकी
गुजरात निवडणुकीचा संदर्भ देऊन पाल पुढे म्हणाले की, “सध्या गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. आम्ही तुम्हाला मतं देऊ इच्छितो. पण तुम्ही त्यासाठी पद्मावती सिनेमा रिलीज होऊ देऊ नका”
पद्मावती’ वाद : संपूर्ण बॉलिवूड भन्साळींच्या समर्थनार्थ मैदानात
पाल यांनी दीपिकाला धमकावण्यासोबतच रणवीर सिंहलाही इशारा दिला आहे. रणवीरने आपले शब्द परत घेतले नाहीत, तर त्याचे पाय तोडून हातात देऊ, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जोपर्यंत सिनेमातून आक्षेपार्ह दृश्य काढले जात नाहीत, तोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचं सांगितलं.
दरम्यान, पद्मावती सिनेमाच्या रिलीजवरुन करणी सेना अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. करणी सेनेने कोणत्याही किमतीत सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह यांच्या मते, पद्मावती सिनेमावर मध्य पूर्व देशातील आणि अडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पैसा लागला आहे.
संबंधित बातम्या
... तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात
'पद्मावती' चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा
‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज
सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली
‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर
एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज
‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
‘पद्मावती’च्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज
रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा
रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement