OTT Release This Week : सिनेमागृहात धमाका केल्यानंतर ओटीटी विश्व (OTT) गाजवण्यासाठी बॉलिवूडपट सज्ज आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे आणि सीरिज नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, झी 5, हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. या सिनेमांची आणि सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) ते विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.


अ‍ॅनिमल (Animal)
कधी रिलीज होणार? 26 जानेवारी 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. ए सर्टिफिकेट, वादग्रस्त संवाद आणि सीन्स असूनही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 900 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. रणबीर कपूर, अनिल कपूर, तृप्ति डिमरी, बॉबी देओल हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. सिनेमागृह गाजवलेला हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होत आहे. संदीप रेड्डी दिग्दर्शित हा सिनेमा 26 जानेवारी 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


सॅम बहादुर (Sam Bahadur)
कधी रिलीज होणार? 26 जानेवारी 2024
कुठे पाहता येणार? झी5


विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. या सिनेमातील विकीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची चांगली कमाई केली. सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादुर' हा सिनेमा 26 जानेवारी 2024 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


नेरु
कधी रिलीज होणार? 23 जानेवारी 2024
कुठे पाहता येणार? डिज्नी प्लस हॉटस्टार


'नेरु' हा मल्याळम सिनेमा 23 जानेवारी 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. सिनेमागृहात या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. जीतू जोसेफ यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मोहनलाल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.


कर्मा कॉलिंग (Karma Calling)
कधी रिलीज होणार? 26 जानेवारी 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


रवीना टंडन यांची आगामी 'कर्मा कॉलिंग' ही सीरिज सध्या चर्चेत आहे. 26 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. रवीना टंडनसह नम्रता शेठ आणि वरुण सूद या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. 


बॅडलँड हंटर्स
कधी रिलीज होणार? 26 जानेवारी 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


बॅडलँड हंटर्स हा कोरियन जिस्टोपियन थ्रिलर सिनेमा आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा 26 जानेवारी 2024 पासून प्रेक्षकांना पाहता येईल.


पंचायत 3 (Panchayat 3)
कधी रिलीज होणार? 26 जानेवारी 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


पंचायतच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ही सीरिज 26 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे दोन्ही सीझन चांगलेच गाजले आहेत.


संबंधित बातम्या


Aarya 3 Antim Vaar Trailer: "मेरी कहानी का हर पन्ना खून से लिखा था"; आर्या -3 चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज