Oscars 2024 Nominationsऑस्कर  (Oscars 2024) हा मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठीत मानला जाणारा पुरस्कार आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेल्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  आज (23 जानेवारी) अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमध्ये ऑस्करसाठी नॉमिनेट झालेल्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ऑस्करच्या शर्यतीत कोणकोणते चित्रपट असणार आहेत? जाणून घेऊयात...


कधी पार पडणार ऑस्कर पुरस्कार सोहळा?


 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळा म्हणजेच ऑस्कर  पुरस्कार सोहळा हा  10 मार्च 2024 रोजी पार पडणार आहे. अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट आणि कॉमेडियन जिमी किमेल हे या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. 


सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत या पुरस्कारांना मिळालं नामांकन


सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पुरस्कारासाठी 10 चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. यामध्ये अमेरिकन फिक्शन, अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, बार्बी, द होल्डोव्हर्स, किलर्स ऑफ द मून, मेस्ट्रो, ओपनहायमर, पास्ट लाइव्ह्स, पुअर थिंग्ज आणि द झोन ऑफ इंटरेस्ट  या चित्रपटांचा समावेश आहे समावेश आहे.


बेस्ट डायरेक्टिंग नॉमिनेशन्स


जस्टिन ट्रीट (अॅनाटॉमी ऑफ फॉल) 
मार्टिन स्कोर्सेसे (किलर्स ऑफ द फ्लावर मून) 
क्रिस्टोफर नोलन (ओपनहायमर) 
योर्गोस लँथिमोस (पूअर थिंग्स) 
जोनाथन ग्लेजर (द जोन ऑफ इंटरेस्ट) 


सर्वोत्कृष्ट अभिनेता-


ब्रॅडली कूपर
कोलमन डोमिंगो
द पॉल गियामट्टी
सिलियन मर्फी
जेफ्री राइट


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-


ऍनेट बेनिंग (न्याड)
लिली ग्लॅडस्टोन (किलर्स ऑफ द फ्लावर मून)
सँड्रा हुलर (एनाटॉमी ऑफ अ फॉल)
कॅरी मुलिगन (मॅस्ट्रो)
एमा स्टोन (पूअर थिंग्स)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-


स्टर्लिंग के ब्राउन (अमेरिकन फिक्शन)
रॉबर्ट डी नीरो (किलर्स ऑफ द मून)
रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपनहायमर) 
रयान गोस्लिंग (बार्बी) 
मार्क रुफालो (पूअर थिंग्स)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-


एमिली ब्लंट (ओपनहायमर)
डॅनियल ब्रूक्स (द कलर पर्पल)
अमेरिका फेरेरा (बार्बी)
जोडी फॉस्टर (न्याड)
दा'वाइन जॉय रँडॉल्फ (द होल्डओव्हर्स)


अडॅप्टेड स्क्रीनप्ले नॉमिनेशन्स-


अमेरिकन फिक्शन
बार्बी
ओपनहायमर
पूअर थिंग्स
एरिया ऑफ इंटरेस्ट


ओरिजिनल स्क्रीनप्ले-


अॅनाटॉमी ऑफ अ फॉल
द होल्डओवर
मॅस्ट्रो
मे डिसेंबर
पास्ट लिव्स


लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म


द आफ्टर
इंविंसिबल
नाइट ऑफ फॉर्च्यून
रेड व्हाइट और ब्लू
द वंडर्फुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर 


अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म


लेटर टू अ पिग
95 सेंसेस
आवर यूनिफॉर्म
पचीडरमे
वॉर इज ओवर


डॉक्युमेंट्री फीचर फिल्म-


बॉबी वाइन: द पीपल्स प्रेसिडेंट
द इटरनल मेमोरी
फोर डॉटर्स
एक बाघ को मारने के लिए
टू किल अ टाइगर


डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म-


द एबीसीस ऑफ 
द बार्बर ऑफ लिटिल रॉक
आयलँड इन बिटवीन
द लास्ट रिपोयर शॉप
नी नाइ एंड वाईपो


इंटरनेशनल फीचर फिल्म नॉमिनेशन्स-


आईओ कॅपिटानो (इटली)
परफेक्ट डेज (जापान)
सोसाइटी ऑफ द स्नो (स्पेन)
द टीचर्स लाउंज (जर्मनी)
द जोन ऑफ इंटेरेस्ट (यूनाइटेड किंगडम) 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscars 2023: विजेत्याची निवड कशी केली जाते? कोण करतं मतदान? जाणून घ्या ऑस्कर पुरस्काराबद्दल