Aarya 3 Antim Vaar Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. सुष्मितानं आर्या  या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर  पदार्पण केलं.  या वेब सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता या  वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच आर्या-3 (Aarya 3) या वेब सीरिजचा ट्रेलर सुष्मितानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये सुष्मिता अॅक्शन मोडमध्ये दिसली.


'आर्या-3' चा ट्रेलर रिलीज (Aarya 3 Antim Vaar Trailer Out)


आर्या-3 या वेब सीरिजच्या ट्रेलरच्या सुरुवातीला सुष्मिता ही एक बंदुक लोड करताना दिसत आहे. ही बंदुक सुष्मिता स्वत:च्याच डोक्याला लावते. "मेरी कहानी का हर पन्ना खून से लिखा था. पर सोचा नहीं था कि उसका अंत मेरे ही खून से होगा." हा सुष्मिताचा डायलॉग ट्रेलरमध्ये ऐकू येतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये सुष्मिताचे काही अॅक्शन सीन्स देखील दिसतात. 


सुष्मिता अॅक्शन मोडमध्ये


आर्य 3 लास्ट वॉरचा ट्रेलर सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.या ट्रेलरमध्ये सुष्मिताचा अॅक्शन मोड पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. ट्रेलरला सुष्मितानं कॅप्शन दिलं, "तुमची आर्या 9 फेब्रुवारी 2024 ला परत येत आहे!!!"


पाहा ट्रेलर:






ट्रेलरमध्ये दिसत आहे की, आर्या अनेक व्यवसाय करत आहे पण ती स्वतःच या व्यवसायाच्या जाळ्यात अडकत आहे. त्यामुळे तिची मुलेही तिच्यापासून दूर जात आहेत.त्यामुळे यावेळी आर्या तिच्या मुलांचे संरक्षण कशी करते ? हे प्रेक्षकांना वेब सीरिज पाहिल्यानंतर पाहिल्यानंतरच कळेल. पण आर्या-3 वेब सीरिजचा हा ट्रेलर खूपच दमदार आणि सस्पेन्सने भरलेला आहे.


आर्या-3 ची स्टार कास्ट


 आर्या-3 या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेनशिवाय इला अरुण, सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, विकास गुप्ता, माया सराव, गीतांजली कुलकर्णी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. आता प्रेक्षक आर्या-3 या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Aarya 3: 'शेरनी के लौटने का वक्त आ गया है'; सुष्मिताच्या आर्या-3 वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर