Dunki OTT release: बॉलीवूडचा किंग खान अर्थातच शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रेम दिलं होतं. सिनेमागृहात  रिलीज झाल्यानंतर, प्रेक्षक या सिनेमाची ओटीटी माध्यमावर  आतुरतेने वाट पाहत होते.  व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शाहरुखने चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचं म्हटलं होतं आणि  अखेर किंग खानने चाहत्यांना खूश केले आहे. शाहरुखचा डंकी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय. 


 राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन ईराणी यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. आता हीच जादू प्रेक्षकांना आता ओटीटीवर देखील पाहायला मिळणार आहे. दरम्यान हा डंकी सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


Dunki OTT release : 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज


मागील बऱ्याच काळापासून या चित्रपटाचे राईट्स कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आहेत, यावर चर्चा सुरु होती. पण याबाबत भाष्य करत राजकुमार हिरानी यांचा डंकी हा सिनेमा ओटीटीवर आला आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या  नेटफ्लिक्सवर डंकी हा सिनेमा पाहता येणार आहे. 






Dunki OTT release : डंकी चित्रपट मित्रांची कहाणी, देशभक्तीची भावना


डंकी चित्रपट मित्रांची कहाणी आहे. हा कहाणी मित्रांच्या एका ग्रुपवर आधारित आहे, जे विदेशात जायचं स्वप्न पाहत असतात. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नूची दमदार केमिस्ट्री दाखवली आहे. विकी कौशल आणि बोमन ईराणी यांच्या भूमिकांनीही लक्ष वेधलं आहे. डंकी चित्रपट 2 तास 41 मिनिटांचा आहे. डंकी चित्रपटाला सेंसर बोर्डाकडून यू ए सर्टिफिकेट मिळालं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, डंकी चित्रपटाचं बजेट 85 कोटी आहे. तर, काही मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट 100 कोटींच्या पुढे असल्याचं म्हटलं जात आहे. शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाला दुबईतील सेंसर बोर्ड स्क्रिनिंगला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आहे. 


Dunki OTT release : 'डंकी' ऑस्करच्या शर्यतीत?


'डंकी' या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या सिनेमातील भावनिक आणि विनोदी असलेली या सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावली आहे. अवैध मार्गाने दुसऱ्या देशात जाणाऱ्या मुलाची गोष्ट 'डंकी' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 96 व्या ऑस्कर अवॉर्ड्समध्ये 'डंकी'ची निर्माते अधिकृत एन्ट्री पाठवू शकतात. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 'डंकी'आधी शाहरुखचा 'पहेली और स्वदेश' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.


ही बातमी वाचा : 


Shah Rukh Khan : शाहरुखचा 'डंकी' ऑस्करच्या शर्यतीत? समोर आली मोठी अपडेट