Rashmika Mandana Forbes 30 Under 30 : यंदाही  फोर्ब्सने आपली '30 अंडर 30' (Forber 30U Under 30) यादी जाहीर केली आहे. या यादीत 30 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या दिग्गज लोकांचा समावेश आहे. या दिग्गजांना आपआपल्या क्षेत्रात स्वत: चा ठसा उमटवला आहे. या यादीत रुपेरी पडद्यावरील तीन अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये रश्मिका मंदना (Rashmika Mandana), राधिका मदान (Radhika Madan) आणि अदिती सहगल (Aditi Saigal) यांच्या नावाचा समावेश आहे. 


फोर्ब्स इंडियाने गुरुवारी, 15 फेब्रुवारी रोजी 30 अंडर 30 ची यादी जाहीर केली. या यादीत सेलेब्सचा समावेश होणे ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली. 


27 वर्षांची रश्मिका मंदाना ही तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. मागील वर्षी तिचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले.  तामिळ सुपरस्टार विजयसह Varisu   चित्रपट झळकला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड 300 कोटी रुपयांची कमाई केली. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती 'मिशन मजून' या स्पाय थ्रिलर मुव्हीमध्ये झळकली होती.नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल' चित्रपटातही तिची भूमिका होती. 






कोण आहे राधिका मदान? (Who Is Radhika Madan)


राधिका मदान ही 28 वर्षांची हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. गेल्या वर्षीही ती तीन चित्रपटांमध्ये झळकली  होती. Kuttey या चित्रपटाने तिच्या मागील वर्षाची सुरुवात झाली होती. मग कच्चे लिंबूमध्ये (Kacchey Limbu) दिसली. हा चित्रपट जिओ सिनेमावर आहे.  त्यानंतर ती 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या रहस्यपटात दिसली होती.राधिका मदान आता अक्षय कुमारसोबत सरफिरा या चित्रपटात झळकणार आहे. 






'द आर्चीज'च्या अदितीने मारली बाजी (Who Is Aditi Saigal )


25 वर्षांच्या अदिती सहगलने आपली छाप सोडली आहे. फोर्ब्सच्या यादीत झळकलेल्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत अदिती फारच तरुण आहे. अदिती ही संगीतकार आणि गायक आहे. झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.  


 






इतर संबंधित बातम्या :