OTT Release This Weekend : वीकेंडला घरी बसून ओटीटी कंटेट पाहून रिलॅक्स करायच्या मूडमध्ये असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. अनेक मनोरंजक वेब सीरीज आणि चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार आहेत. त्यामुळे तुमचा मनोरंजनाचा मीटर फुल ऑन असणार आहे. या आठवड्यातही ओटीटीवर अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत, त्यांची यादी पाहा.


इमर्जन्सी (Emergency)


अभिनेत्री कंगना राणौतचा बहुचर्चित 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर शुक्रवारी 17 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगना रणौतने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तिनेच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.


आझाद (Azaad)


श्रीमंत घरातील मुलगी आणि गरीब घरातील मुलगा यांची प्रेमकहाणी दाखवणार आझाद चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा तडानी आणि अभिनेता अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण यांनी 'आझाद' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. 


पाताल लोक सीझन 2 (Paatal Lok 2) 


बहुप्रतिक्षित वेब सिरीज पाताल लोकचा दुसरा सीझन भेटीला आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या या सीरिजची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. ही सीरीज 17 जानेवारीपासून प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) पाहता येईल. 


हेल ​​बॉय - द क्रुक्ड मॅन (Hellboy- The Crooked Man)


गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट 'हेल बॉय - द क्रुक्ड मॅन' आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या शुक्रवारपासून, हा चित्रपट प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म लायन्स गेटवर (Lionsgate) पाहता येईल.


पाणी (Pani Movie)


गेल्या वर्षी 'पाणी' या मल्याळम थ्रिलर चित्रपटाचे खूप कौतुक झाले होते. ही केरळमधील त्रिशूरच्या अंडरवर्ल्डची कहाणी आहे. हा चित्रपट 15 जानेवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म सोनीलिव्हवर स्ट्रीम केला जात आहे.


गृह लक्ष्मी (Griha Laxmi)


हिना खानची 'गृह लक्ष्मी' ही वेब सीरीज 16 जानेवारीला प्रदर्शित झाली आहे. रुमन किडवाई दिग्दर्शित या सीरीजमध्ये चंकी पांडे, राहुल देव आणि दिब्येंदु भट्टाचार्य यांच्याही भूमिका आहेत. ही कथा बेतालगड शहरात राहणाऱ्या लक्ष्मीची आहे. एका असहाय्य गृहिणीचा एका धोकादायक साम्राज्याची राणी बनण्यापर्यंतचा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. ही मालिका Epic On या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


द रोशन  (The Roshans) 


बॉलिवूडचे ज्येष्ठ निर्माते राकेश रोशन आणि सुपरस्टार हृतिक रोशन यांनी चित्रपटसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या आतापर्यंतचा प्रवास 'द रोशन्‍स' या डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवण्यात आला आहे. 17 जानेवारीपासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) उपलब्ध आहे.


पावर ऑफ फाय (Power Of Five)


सुपरहिरो वेब सीरिज पॉवर ऑफ फाइव्ह 17 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar)प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत तुम्हाला ५ मुलांमध्ये सुपर पॉवर्स असल्याची कहाणी दाखवली जाईल.


आय वॉन्ट टू टॉक (I Want To Talk)


अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक शुजित सरकार यांचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट 17 जानेवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :