Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास त्याच्याच घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्या हल्लेखोरानं तिथून पळ काढल. हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, त्याच्या मणक्याला गंभीर इजा झालेली असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, आता सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती लीलावती रुग्णालयातील (Lilavati Hospital) डॉक्टरांनी दिली आहे.
घरात घुसलेल्या चोरानं सैफवर चाकू हल्ला केला, त्यावेळी त्यानं सैफच्या पाठीवर वार केले. चोराच्या हातात असलेल्या धारदार शस्त्राचा एक तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर सैफच्या पाठीतून 2.5 इंचाचा धारदार शस्त्राचा तुकडा बाहेर काढला. सैफची प्रकृती गंभीर होती. त्याच्या मणक्यातून पाणी येत होतं, ज्यामुळे, त्याला पॅरालिसिसचा धोका होता. अशातच डॉक्टरांनी तात्काळ सैफ अली खानवर उपचार केले, त्याची शस्त्रक्रिया तब्बल अडीच तास चालली. आता सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टर नितीन डांगे यांनी दिली.
सैफ अली खानची प्रकृती कशी?
सैफ अली खानला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर त्याला तात्काळ वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेव्हा अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी तो गंभीर जखमी होता. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. सैफ अगदी रक्तबंबाळ झाला होता. त्यानंतर त्याच्या आवश्यक त्या सर्व तपासण्या करुन त्याच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या अभिनेत्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. लीलावती रुग्णालयातील सर्जन डॉ. नितीन एन. डांगे यांनी एबीपी न्यूजला याबाबत एक्सक्ल्युझिव्ह माहिती दिली. डॉक्टर नितीन डांगे म्हणाले की, चाकूडा अंडीच इंचाचा तुकडा सैफच्या पाठीत खोलवर घुसला होता. तो तातडीनं शस्त्रक्रिया करुन काढावा लागला. चाकू डिपमध्ये गेल्याने मज्जातंतूच्या जवळपास इजा झाली होती. पाठितील जे पाणी असतं, ते लीक होतं होतं. तिथं आम्ही ऑपरेशन केलं, असंही त्यांनी सांगितलं. तसेच, आता सैफ पूर्णपणे शुद्धीवर आहे, त्याला कोणतीही समस्या नाही आणि त्याला असलेला पॅरालिसीसचा धोकाही टळला आहे.
सैफ अली खानला डिस्चार्ज कधी?
एबीपी माझाशी बोलताना लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) डॉ. नीरज उत्मानी यांनी सांगितलं की, सैफ अली खानला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे आणि त्याला एक दिवस अंडर ऑब्जर्वेशन ठेवावं लागणार आहे. तसेच, आता सैफच्या जीवाला किंवा इतर कोणताही धोका नाही. सैफ आता 100 टक्के बरा होणार आहे. हल्ल्यामुळे सैफला दोन जखमा अगदी खोलवर झाल्या आहेत. तर, दोन किरकोळ जखमा आणि दोन ओरखडे आहेत. तसेच, सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला बहुदा आज किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
पाहा व्हिडीओ : Dr Nitin Dange on Saif Ali Khanजखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVE
महत्त्वाच्या इतर बातम्या :