OTT Release Feb 2024 : कोरोनानंतर सिनेमागृहापेक्षा घरबसल्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. अनेक दर्जेदार कलाकृतींची मेजवानी प्रेक्षकांना घरबसल्या मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका होणार आहे. 'आर्या 3' (Aarya 3) ते 'भक्षक' (Bhakshak) या अनेक कलाकृती ओटीटीवर रिलीज होणार आहेत.


सैंधव 2 (Saindhav 2)
कधी होणार रिलीज? 2 फेब्रुवारी
कुठे पाहता येणार? प्राईम व्हिडीओ


'सैंधव 2' हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोडजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांना एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. नवाजुद्दी सिद्दीकीसह या सिनेमात आर्य, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, एंड्रिया जेरेमिया आणि बेबी सारा मुख्य भूमिकेत आहेत. 


आर्या 3 (Aarya 3)
कधी रिलीज होणार? 9 फेब्रुवारी 2024
कुठे पाहता येणार? डिज्नी प्लस हॉटस्टार


'आर्या 3' ही बहुचर्चित वेबसीरिज 9 फेब्रुवारी 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आतापर्यंत या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट झाले आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत आहेत. सुष्मितासह इला अरुण, सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, विकास कुमार, माया सराओ, गीतांजली कुलकर्णी, श्वेता पसरीचा, वीरेन वजीरानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राम माधवानी यांनी या सीरिजचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.


भक्षक (Bhakshak)
कधी रिलीज होणार? 9 फेब्रुवारी
कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स


भक्षक या सिनेमामध्ये भूमी पेडणेकर, संजय मिश्रा, सई ताम्हणकर आणि आदित्य श्रीवास्तव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये भूमी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पुलकितने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे.


द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ (The Indian Mukerjea Story Buried Truth)
कधी रिलीज होणार? 23 फेब्रुवारी 2024
कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स


'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ' ही सीरिज शीना बोरा हत्याकांडावर आधारित आहे. ही सीरिज 23 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने नुकतीच या सीरिजची घोषणा केली आहे.


संबंधित बातम्या


Telly Masala : सिद्धार्थ जाधवच्या 'लग्नकल्लोळ'चा धमाकेदार टीझर आऊट ते फेब्रुवारीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डोस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या