Shahid Kapoor Play Chhatrapati Shivaji Maharaj : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'कबीरसिंह', 'पद्मावत', 'जर्सी' आणि 'हैदर'सारखे सुपरहिट सिनेमे देणारा अभिनेता आता ऐतिहासिक सिनेमा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.


शाहिद कपूरने जॅकी आणि वासु भगनानी यांच्या बिग बजेट सिनेमासाठी आपला होकार कळवला आहे. तसेच एका आगामी ऐतिहासिक सिनेमात शाहिद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.


शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका


पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूर आणि 'ओएमजी 2'चे (OMG 2) दिग्दर्शक अमिर राय (Amit Rai) यांचं बोलणं सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असू शकतो. अश्विन वर्दे या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शाहिद कपूर आणि अश्विन यांचं छत्रपती शिवादी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमासंदर्भात बोलणं सुरू आहे. सकारात्मक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल". 


शाहिद कपूर आणि निर्माते अनेक दिवसांपासून चांगल्या दिग्दर्शकाच्या शोधात होते. अशातच आता अमित राय यांना भेटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासाठी ते योग्य आहेत, असं शाहिदला वाटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य आणि पराक्रमाची या सिनेमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. 






भारतीय सिनेसृष्टीतील महागडा चित्रपट


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमासाठी शाहिद कपूरने आपला होकार दिला आहे. लवकरच या सिनेमाची घोषणा होऊ शकते. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, भारतीय सिनेसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही. सिनेप्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Shahid Kapoor Kriti Sanon : शाहीद कपूर आणि क्रिती सेननच्या रोमान्सची भलतीच चर्चा; रिलीज झालं टायटल ट्रॅक