Poonam Pandey : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्वायकल कॅन्सरने (Cervical cancer) निधन झाल्याची खोटी बातमी (Fake News) पसरवल्यामुळे आता पूनम पांडेला (Poonam Pandey Death Fake News) अटक होऊ शकते, असे म्हटले जात आहे. मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याने महाराष्ट्राच्या MLA सदस्यांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


पूनम पांडेच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अशातच दुसऱ्या दिवशी आपण जिवंत आहोत असं म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला. तसेच सर्वायकल कॅन्सरसंदर्भात एक वेबसाईट सुरू केल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. सर्वायकल कॅन्सरसंदर्भात जगजागृती करण्यासाठी अफवा पसरवली असल्याचं तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं. त्यामुळे आता सेलिब्रिटी, चाहत्यांसह नेटकरी तिची शाळा घेत आहेत. 


पूनम पांडेला मरणाचं सोंग पडणार महागात


पूनम पांडेला स्वत:च्या मृत्यूचा बनाव भारी पडणार आहे. 24 तासांत लेखी माफीनामा सादर करावा, अन्यथा कामबंद आंदोलन करू अशी वेस्टर्न इंडिया सिनेकामगार संघटनेची मागणी आहे. अन्यथा पूनम पांडेचा सहभाग असलेल्या कुठल्याही शूटमध्ये सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पूनमने आपला कॅन्सने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली होती.



सत्यजीत तांबेंनी केली पूनमला अटक करण्याची मागणी


पूनमच्या निधनाची अफवा असल्याचं समोर आल्यानंतर मनोरंजनसृष्टीसह राजकीय मंडळीदेखील आपली मतं मांडत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (MLA) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी एक्सवर री-पोस्ट करत पूनमवर कायदेशीर कारवाई करण्यची मागणी केली आहे. 






पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल (Poonam Pandey FIR)


मुंबईतील वकील अली काशिफ खान यांनी पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी मॅनेजर निकिता शर्मा आणि एजेंसी हॉटरफ्लायचादेखील (Hautterfly) उल्लेख केला आहे. कलम 417, 420, 120 ब आणि 24 क या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


कोण आहे पूनम पांडे (Who is Poonam Pandey)


पूनम पांडे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या हॉट अंदाजाने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 2013 मध्ये 'नशा' या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. अनेक सिनेमांत आणि छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांत तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.


संबंधित बातम्या


Poonam Pandey : "पूनम पांडे जिवंत"; निधनाच्या अफवांना पूर्णविराम देत शेअर केला व्हिडीओ