Oscars 2024 Winner List : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2024) सोहळा धामधुमीत पार पडतो आहे. यंदा या पुरस्काराचे 96 वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. 'ऑस्कर 2024' साठी संपूर्ण जगभरातील सेलिब्रिटींचा मेळावा लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये भरला आहे.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार (Academey Awards) सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सुपरहिट सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. जिमी किमेल यंदा चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर सिनेप्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल.
ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलेल्यांची संपूर्ण यादी (Oscars 2024 Full Winner List)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दा'वाइन जॉय रँडॉल्फ (DA'Vine Joy Randolph)
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म - वॉर इज ओव्हर (War is Over)
- सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचरचा पुरस्कार - द बॉय अँड द हेरॉन (The boy and the Heron)
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले - ॲनाटॉमी ऑफ अ फॉल (Anatomy of a Fall)
- सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले - अमेरिकन फिक्शन (American Fiction)
- सर्वोत्कृष्ट केशभुषा आणि मेकअप - 'पुअर थिंग्स' (Poor Things)
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - पुअर थिंग्स (Poor Things)
- सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन - होली वॉडिंग्टन (पुअर थिंग्स) (Holly Waddington - Poor Things)
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट - द झोन ऑफ इंटरेस्ट (The Zone of Interest)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ट डाउनी (Robert Downey JR)
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - गॉडझिला मायनस वन (Godzilla Minus One)
- फिल्म एडिटिंग - ओपनहायमर (Oppenheimer)
- सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टफिल्म - द लास्ट रिपेअर शॉप (The Last Repair Shop)
- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - 20 डेज इन मारियुपोल (20 Days in Mariupol)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफी - ओपनहायमर (Oppneheimer)
- लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर (The Wonderful Story of Henry Sugar)
- सर्वोत्कृष्ट साऊंड - द झोन ऑफ इंटरेस्ट (The Zone of Interest)
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर - ओपनहायमर (Oppenheimer)
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं - ‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?' गाणं (Billie Eilish What Was I Made For)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - सिलियन मर्फी (Cillian Murphy - Oppenheimer)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan - Oppenheimer)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन (Emma Stone - Poor Things)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - ओपनहायमर (Oppenheimer)
संबंधित बातम्या