Oscars 2023 :

  'ऑस्कर 2023' Oscars 2023) हा सोहळा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खास होता. भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या ड्राक्युमेंट्रीनं 'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ऑस्कर पटकावला आहे. 'नाटू नाटू' गाण्याचे गीतकार एम.एम किरवाणी (M M Keeravaani) आणि गीतकार चंद्रबोस यांनी स्टेजवर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. यावेळी एम.एम किरवाणी यांनी खास अंदाजात भाषण केले. 


एम.एम किरवाणी यांचे भाषण


'थँक्यु अकादमी' असं म्हणाले. त्यानंतर एम.एम किरवाणी यांनी सांगितलं की, "माझं बालपण कारपेंटर्सचं बोलणं ऐकण्यात गेलं आणि आज मी ऑस्कर घेऊन उभा आहे." त्यानंतर एम.एम किरवाणी यांनी स्टेजवर गाण्याच्या स्वरुपात भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "आरआरआर चित्रपटाचा भारतीयांना अभिमान वाटावा, अशी माझ्या मनात इच्छा होती. राजामौली आणि माझ्या कुटुंबाची देखील तिच होती. आता मला टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखे वाटत आहे.' धन्यवाद कार्तिकेय, आणि तुम्हा सर्वांचे आभार." एम.एम किरवाणी यांनी तालासूरात केलेल्या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले.


पाहा व्हिडीओ:






अनेक लोक एम.एम किरवाणी यांच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील या भाषणाचं कौतुक करत आहेत. एम.एम किरवाणी यांच्या भाषणाच्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण ही स्माईल करताना दिसत आहे. 


एम.एम किरवाणी यांचा जन्म 4 जुलै 1961 रोजी आंध्र प्रदेशमधील कोव्वुर येथे झाला. 1987 मध्ये एम.एम किरवाणी यांनी आपल्या करिअरची सुरुवात संगीत दिग्दर्शक म्हणून केली. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. 


आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केलं.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscar Awards 2023:  युक्रेनमध्ये झाले 'नाटू नाटू' गाण्याचे शूटिंग, संगीतकार आणि गीतकार कोण? जाणून घ्या ऑस्कर जिंकणाऱ्या गाण्याबद्दल...