Oscars 2023 Winners Full List : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर (Oscars 2023) ओळखला जातो. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (academy awards) लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये धामधुमीत पार पडला. 

'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यात 'एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स' (Everything Everywhere All at Once) या सिनेमाने बाजी मारली असून भारतानेदेखील इतिहास रचला आहे. भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म (Best Documentary Short Film) या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं (Naatu Naatu) 'बेस्ट ओरिजनल सॉन्ग' या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

'ऑस्कर 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या... (Oscars 2023 Winners Full List)

  • सर्वोत्कृष्ट सिनेमा - एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
  • सर्वोत्तम दिग्दर्शन : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'
  • बेस्ट फिल्म एडिटिंग : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'
  • बेस्ट साऊंड - टॉप गन: मेव्हरिक
  • बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग
  • बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
  • बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- द एलिफंट व्हिस्परर्स
  • बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर
  • बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
  • बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स 
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर
  • सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल - द वेल
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जेम्स फ्रेंड
  • सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - आयरिश गुडबाय
  • बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म - नवलनी
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान
  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पिनोकियो

संबंधित बातम्या

Oscar Awards 2023 Live: कोण मारणार बाजी? जाणून घ्या 'ऑस्कर 2023' च्या प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर