Oscar Awards 2022 : आज 94 व्या ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन जाहीर झाले आहेत. यात 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. तसेच या जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात भारताने पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण केले आहे. 'राइटिंग विथ फायर' या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले आहे.





'राइटिंग विथ फायर' माहितीपटाने 94 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकन यादीत स्थान मिळवले आहे. एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन यांनी मंगळवारी 'अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स'च्या ट्विटर अकाऊंटवर माहितीपटांच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटांच्या यादीत 'राइटिंग विथ फायर' माहितीपटाचादेखील समावेश आहे.





रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी 'राइटिंग विथ फायर' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 'राइटिंग विथ फायर' सिनेमात 'खबर लहरिया'च्या उदयाची गोष्ट सांगितली आहे. 'खबर लहरिया' हे एक भारतातील वृत्तपत्र आहे. हे दलित महिलांनी चालवलेले भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. या माहितीपटात दलित महिलांवर भाष्य करण्यात आले आहे. 27 मार्च रोजी ऑस्कर विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.


संबंधित बातम्या


Oscar Awards 2022 : 'ऑस्कर नामांकनाच्या यादीत 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन, 'जय भीम' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाद


Jigna Vora : 'स्कॅम 1992' नंतर हंसल मेहता यांची नवी सीरिज; पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर आधारित असणार कथानक


Jhund Teaser : 'झुंड'चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha