Jaideep Ahlawat Biography : जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat) हे आज अभिनेय क्षेत्रात नवीन किंवा न ऐकलेले नाव नाही. पाताल लोक या वेबसिरीजमधील हाथीराम चौधरी प्रेक्षकांच्या घरी तर पोहोचलाच होता. पण आपल्या दमदार अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनातही आपलं स्थान निर्माण केलं आहे. जयदीपने अहलावतने सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी त्याला चाहत्यांची पसंतीही मिळाली.


दुसरीकडे, त्याने साकारलेल्या प्रसिद्ध पात्रांबद्दल बोलायचे तर, पाताल लोकमध्ये (paatal lok) हाथीराम चौधरीची भूमिका साकारून त्याला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर जयदीपला अनेक चांगल्या संधी मिळत गेल्या. पण, अभिनयात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या जयदीपने अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. खरंतर, त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. 


सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते


दरम्यान, एका मुलाखतीत स्वत: जयदीप अहलावतने सैन्यात भरती होण्याची मनापासून इच्छा व्यक्त केली होती. त्याने सांगितले होते की, "मला अभिनयात जायचे नाही तर सैन्यात जायचे आहे आणि सैन्य अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे." यासाठी त्याने तयारी करून परीक्षाही दिली होती. मात्र, तो परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला. सुरुवातीला जयदीपला या क्षेत्रात फारसा रस नव्हता. पण, जेव्हा त्याने काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला खूप मजा येऊ लागली आणि मग त्याने ठरवले की, आता अभिनयातंच जीव लावून काम करायचं. 


गॅंग्स ऑफ वासेपूरमध्ये निभावली होती छोटी भूमिका


गँग्स ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) या वेब सीरिजमध्ये जयदीप अहलावतने एक छोटी भूमिका साकारली होती. या छोट्या भूमिकेतूनसुद्धा त्याच्या कामाचे कौतुक झाले. यानंतर गब्बर इज बॅक, रईस आणि राजीमधील त्याचे काम लक्षात घेण्याजोगे होते. पण, 2020 मध्ये, पाताल लोक या वेब सीरिजने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. या वेब सीरिजमध्ये त्याने पोलीस इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीची भूमिका साकारली असून या भूमिकेत त्याला सर्वाधिक पसंती मिळाली होती. या भूमिकेसाठी त्याला गौरविण्यातही आले होते. अनुष्का शर्माची निर्मिती असलेली ही वेबसिरीज खूपच लोकप्रिय ठरली.  


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha