एक्स्प्लोर

ओसामा बिन लादेन चक्क कुमार सानू-अल्का याज्ञिकचा फॅन!

ओसामाच्या कम्प्युटरमध्ये नर्सरीतली बडबड गीतंही होती. शिवाय ओसामाला टॉम अँड जेरीचे कार्टून्सही आवडायचे.

न्यूयॉर्क : अख्ख्या जगाला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन चक्क आपल्या बॉलिवुडच्या प्रेमात होता. कुमार सानू, उदित नारायण, अल्का याज्ञिक यासारखी नव्वदच्या दशकातील गायक मंडळी ओसामाची फेव्हरेट असल्याचं समोर आलं आहे. दिलजल्यांचा तारणहार कुमार सानू ओसामाला प्रचंड आवडायचा. उडत्या चालींची गाणी गाणारा उदित नारायणही ओसामाला भुरळ घालायचा. फक्त गायकच नाही, तर गायिकांच्याही प्रेमात ओसामा पडला होता. अलका याज्ञिक तर ओसामाची मोस्ट फेव्हरेट. 2011 साली अबोटाबादमधल्या ओसामाच्या घरात केलेल्या ऑपरेशन जेरोनिमोमध्ये सील कमांडोजनी त्याचा खात्मा केला. त्यावेळी त्याच्या घरातला कम्पुटरही जप्त करण्यात आला. त्यातील तब्बल 4 लाख 70 हजार फाईल्स सीआयएनं रिट्राईव्ह केल्या आहेत. आत्मघातकी स्फोटांची प्रात्यक्षिकं, सामूहिक हत्या, नाईन-ईलेव्हनच्या कटाच्या अनेक फाईल्स, आयसिससोबतचे मतभेद, काश्मीरसंदर्भातल्या बातम्या... अशा अनेक फाईल्स या कम्प्युटरमध्ये दडल्या होत्या. त्यातल्या काही फाईल्स सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेऊन, बाकीच्या सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. त्यात ही माहिती समोर आली आहे. ओसामाच्या या कम्प्युटरमध्ये नर्सरीतली बडबड गीतंही होती. शिवाय ओसामाला टॉम अँड जेरीचे कार्टून्सही आवडायचे. त्याच्या या कम्प्युटरमध्ये अँट्स आणि कार्स ही अॅनिमेटेड फिल्मही होती. या कम्प्युटरमधून ओसमाला स्पोर्ट्सचंही वेड असल्याचं समोर आलं आहे. फिफा वर्ल्डकपमधले बेस्ट गोलही त्यानं या कम्प्युटरमध्ये सेव्ह करुन ठेवले होते. ब्राझिलचा गारिन्चा, कॅमरूनचा रॉजर मिला, स्पेनचा फर्नांडो टोरेस हे त्याचे आवडते खेळाडू. त्यांनी केलेले भन्नाट गोल्स ओसामानं आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करुन ठेवले होते. ओसामा किती क्रूर होता, हे अख्ख्या जगानं पाहिलं. पण त्याची नजर भारतावरही होती. कारण त्याच्या कम्प्युटरमध्ये दिल्लीतल्या 2010 च्या हॉकी वर्ल्डकपच्या सुरक्षेसंदर्भातल्या उपाययोजनांच्या फाईल्सही त्याच्याकडे होत्या. शिवाय स्टोरी ऑफ इंडियाची अख्खी सीरिज त्याच्याकडे होती. पण भारताकडे त्याची वाकडी नजर वळण्याआधीच त्याचा खात्मा झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget