Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहाइमर' (Oppenheimer) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.


'ओपनहाइमर' हा सिनेमा भारतात हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या सात दिवसांत जगभरात या सिनेमाने 2050 कोटींची कमाई केली आहे. पण जगभरात सध्या 'बार्बी' (Barbie) या सिनेमाचा बोलबाला आहे. 'बार्बी' या सिनेमाची भारतात कमी क्रेझ असली तरी जगात मात्र चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळे जगभरात या सिनेमाने 'ओपनहाइमर'ला मागे टाकत 3875 कोटींची कमाई केली आहे. 


'ओपनहाइमर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन.... (Oppenheimer Box office Collection)


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'ओपनहाइमर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Oppenheimer Opning Day Collection) 14.4 कोटींची दणदणीत कमाई केली. पुढे या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झालेली पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी 17 कोटी, तिसरा दिवस 17.25 कोटींची कमाई केली. वीकेंडला चांगली कमाई केल्यानंतर सिनेमाच्या कमाईत घट व्हायला लागली. चौथ्या दिवशी सात कोटी, पाचव्या दिवशी 6.25 कोटी, सहाव्या दिवशी 5.9 कोटी, सातव्या दिवशी 5.3 कोटींची कमाई केली. एकंदरीत आतापर्यंत भारतात या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 73.2 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल.


अमेरिकन शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'ओपनहाइमर' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यातही अडकला. पण सिनेमाच्या कमाईवर त्याचा काहीही परिणाम झाला आहे. ख्रिस्तोफर नोलनचे चाहते गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्याने ते सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहत आहेत. 


'ओपनहायमर'बद्दल जाणून घ्या... (Oppenheimer Movie Details)


'ओपनहायमर' (Oppenheimer) हा सिनेमा जे. रॉबर्ट ओपेनहायमर  (J. Robert Oppenheimer) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. 'फादर ऑफ द अॅटॉमिक बॉम्ब' म्हणूनही ते ओळखले जातात. अणुबॉंबचे जनक असलेल्या जे. रॉपर्ट ओपेनहायमर यांचा प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहे. हा सिनेमा ओपेनहायमर यांची पहिली अणुचाचणी 'ट्रिनिटी'बद्दल भाष्य करणारा आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. जगभरातील सिनेप्रेमींच्या हा सिनेमा पसंतीस उतरला आहे.


संबंधित बातम्या


Christopher Nolan : दिग्दर्शकाच्या नावावरच Oppenheimer हाऊसफुल्ल; भन्नाट हॉलिवूडपट देणारा ख्रिस्तोफर नोलन कोण आहे?