Kangana Ranaut Visited Nashik Trimbakeshwar Temple : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी कंगना धार्मिक आहे. अनेकदा ती वेगवेगवळ्या मंदिरांना भेट देत असते. आता तिने नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) या तीर्थस्थानाला भेट दिली आहे. 


कंगनाने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थानाला भेट दिली असून महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली ती दिसून आली. कंगनाने तिच्या कुटुंबियांसह त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिराचे दर्शन घेतले आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टकडून कंगनाचा सत्कारही करण्यात आला. कंगनाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.






कंगनाने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"आज त्र्यंबकेश्वरला भेट दिली". या फोटोमध्ये कंगना पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. कंगनाच्या या पोस्टवर हर हर महादेव, सनातनी क्वीन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. कंगनाला शंकराची खूप ओढ आहे. श्रावणातील सोमवारी तिने तिच्या घरी रुद्र अभिषेकाचे आयोजन केले होते. 


कंगना रनौत हिंदू धर्माचा पुरस्कार करणारी आहे. अनेकदा ती पूजा किंवा वेगवेगळ्या मंदिरात जाऊन देवदर्शन करताना दिसते. कंगनाने काही दिवसांपूर्वी केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं होतं. केदारनाथमधील कंगनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता पुन्हा तिने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थानाला भेट दिली आहे. 


कंगनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Project)


कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'तेजस' (Tejas) या सिनेममुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा या सिनेमातील लूक रिलीज करण्यात आला आहे. तसेच तिचा 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच तिचा बहुचर्चित 'इमर्जन्सी' (Emergency) हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासोबत पंगा क्वीन या सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : प्रतीक्षा संपली! कंगना रनौतच्या 'तेजस'ची रिलीज डेट समोर; वैमानिकेच्या भूमिकेत झळकणार 'पंगाक्वीन'