Oppenheimer Advance Booking : 'ओपेनहाइमर' (Oppenheimer) हा हॉलिवूड (Hollywood) सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनने (Christopher Nolan) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला (Oppenheimer Advance Booking) सुरुवात झाली असून भारतात या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. 


'ओपेनहाइमर' (Oppenheimer Advance Booking) या सिनेमाकडे जगभरातील सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 'ओपेनहाइमर' हा सिनेमा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपेनहाइमर (Robbert Oppenheimer) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने (Cillian Murphy) या सिनेमात जे रॉबर्ट यांची भूमिका साकारली आहे.


मुंबई-दिल्लीत 'ओपेनहाइमर'चे शो सोल्ड आऊट (Oppenheimer Tickets Sold Out)


'ओपेनहाइमर' हा सिनेमा येत्या 21 जुलैला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. भारतीय सिने-रसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असल्याने रिलीजआधीच भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. भारतात या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 90 हजार तिकीट विकले गेले आहेत. रिलीजआधी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाचे 1 लाख 20 हजार तिकीटे विकले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई-दिल्लीत तर 'ओपेनहाइमर'चे शो हाऊसफुल्ल आहेत. 


कोरोनानंतर अक्षय कुमार, हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि सलमान खान यांचे सिनेमे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जादू दाखवण्यात कमी पडले. पण क्रिस्टोफर नोनल यांचे सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करत आहेत. 'टेनेट', 'द डार्क नाइट राइजेस', 'इंटरस्टेलर', 'इन्सेप्शन',  अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. 


'ओपेनहाइमर'चे रात्री 12 नंतरचे शोही हाऊसफुल्ल


रिपोर्टनुसार, 'ओपेनहाइमर' या सिनेमाचा ठाण्यातील एका सिनेमागृहात 20 जुलै 2023 रोजी रात्री 11.59 मिनिटांचा खास शो आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे रिलीज डेटच्या आधीच हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुंबई-दिल्लीत अनेक सिनेमागृहांत रात्री 12 नंतरचे शोही हाऊसफुल्ल आहेत.


'ओपेनहाइमर'च्या तिकीटाची किंमत काय आहे? (Oppenheimer Tickets Price)


'ओपनहाइमर' या सिनेमाच्या तिकीटांची किंमत दोन हजार पाचशे रुपये आहे. 2500 तिकीटांची किंमत असूनही या सिनेमाचे तिकीटे सोल्ड आऊट आहेत. सध्यातरी वीकेंडपर्यंतचे या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल आहेत. 'ओपेनहाइमर' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Cillian Murphy : 'Oppenheimer'साठी हॉलिवूड अभिनेता सिलियन मर्फीने केले 'Bhagavad Gita'चे पठण; म्हणाला...