Kartik Aryan Chandu Champion Shooting: बॉलिवूडमधील अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) प्रत्येक चित्रपटात ऑफबीट व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या कार्तिक हा त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या आगमी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे. एका रिपोर्टनुसार,  कार्तिकनं 102 डिग्री ताप असताना 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामधील एक अंडरवॉटर सीन शूट केला आहे.


कार्तिक हा सध्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये करत आहे. कार्तिक हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. कार्तिकसाठी  हा चॅलेंजींग रोल आहे. एका मुलाखतीमध्ये  'चंदू चॅम्पियन'या चित्रपटाच्या सेटवरील एका व्यक्तीनं सांगितले की, 'कार्तिकला शूटिंगदरम्यान खूप ताप आला होता, पण तरीही तो लंडनला पोहोचला, कारण शूटिंगचे शेड्यूल खूप महत्त्वाचे होते.'


पुढे त्या व्यक्तीनं सांगितलं, 'लंडनमधील लोकेशनचं बुकिंग रिशेड्युल करता आले नसते. त्यामुळे कार्तिकला त्याच वेळी शूटिंग पूर्ण करावं लागलं. अशा परिस्थितीत ताप असतानाही कार्तिकनं थंड पाण्यात जाऊन चित्रपटाचा सीन शूट केला. त्यावेळी कार्तिकला 102 डिग्री ताप होता.'






कार्तिकचे चित्रपट


कार्तिक (Kartik Aryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. कार्तिक आर्यनचा'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता.  भूल भुलैया-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. सुप्रिया पाठक, गजराज राव, अनुराधा पटेल, राजपाल यादव या कलाकारांनी देखील 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. कार्तिकच्या भूल भुलैया-2 आणि लुका छुपी (Luka Chuppi) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


कार्तिकनं आता 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Kartik Aryan And Kiara Advani: 'सिद्धार्थ भावा, मी असतो तर हे सहन नसतं केलं'; कियारा आणि कार्तिकच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स