Operation Valentine Trailer :

  पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला (Pulwama Terror Attack) आणि  त्यानंतर भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या एअर स्ट्राईकचा (Air Strike) थरार आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'ऑपरेशन व्हेलेंटाईन' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Operation Valentine Movie Trailer) करण्यात आला आहे. पुलवामामध्ये  सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या कारवाईच्या घटनेभोवती या चित्रपटाचे कथानक आहे. 


सलमान खानने लाँच केला ट्रेलर 


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) हस्ते हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलर शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये 'जो होगा देखा जाएगा' असे म्हटले. चित्रपटाचा ट्रेलर लाँच करताना मला आनंद होत असल्याचे सलमान खानने म्हटले.






दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट 


'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची कथा 2019 साली झालेल्या पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण तेज (Varun Tej) आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर  (Manushi Chhillar)प्रमुख भूमिकेत आहे. हा एक हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.  एकीकडे सलमानने चित्रपटाचा ट्रेलर हिंदीत लाँच केला, तर दुसरीकडे राम चरणने तेलगू भाषेत चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. 


 






कधी होणार रिलीज?


शक्ती प्रताप सिंग यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा 1 मार्च रोजी  चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


इतर संबंधित बातम्या :