Don 3 :  'डॉन-3' च्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. आता डॉन-3 मध्ये (Don 3) अभिनेता रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) कोणती अभिनेत्री काम करणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. रणवीर सिंहच्या एन्ट्रीनंतर त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले होते. आता त्या अभिनेत्रीच्या नावावरून पडदा उघडण्यात आला असून अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


एक्सेल मुव्हीने कियारा आडवाणीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. कियारा आडवाणीचं डॉन युनिव्हर्समध्ये स्वागत... असे कॅप्शन देण्यात आले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 






मोठ्या पडद्यावर दिसणार रणवीर-कियाराची केमिस्ट्री 


रणवीर आणि कियाराची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. दोघेही दमदार कलाकार असून ते साकारत असलेली व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. पहिल्यांदाच एकत्रितपणे काम करत असलेली ही जोडी आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


'डॉन 3' मध्ये कियाराच्या एन्ट्रीने चाहते खूश झाले आहेत. चाहत्यांनी या चित्रपटात तू आपली छाप सोडशील असे म्हटले. तर, एकाने  'वेलकम डॉनची डार्लिंग  कियारा अडवाणी. अन्य एका चाहत्याने सिनेसृष्टीत तुझ्यासारखी कोणी नाही असे म्हटले. 


फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. याआधीच्या दोन्ही भागांचेही दिग्दर्शन फरहानने केले होते. आता तिसऱ्या भागात कमाल करण्यास फरहान सज्ज झाला आहे. 


रणवीर झाला बॉलिवूडचा तिसरा डॉन


अमिताभ बच्चन यांनी 1978 मध्ये रिलीज झालेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित डॉन या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली. या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या डॉन चित्रपटात शाहरुख खाननं डॉनची भूमिका साकारली.






2011 मध्ये रिलीज झालेल्या डॉन 2 चित्रपटामध्ये देखील शाहरुखनेच डॉनची भूमिका साकारली. आता डॉन-3 चित्रपटामध्ये रणवीर सिंह डॉन ही भूमिका साकारणार असून तो आता बॉलिवूडचा तिसरा डॉन ठरला आहे.