Maharani 3 Trailer :  बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी असलेली पॉलिटिकल थ्रिलर ड्रामा वेबसीरिज महाराणी (Maharani Web Series) या वेब सीरिजचा तिसरा सीझन (Maharani 3) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज या वेब सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या तिसऱ्या सीझनमध्ये राणी भारती देवी (Rani Bharati) आणि मुख्यमंत्रीपदी आलेल्या नवीन कुमारमध्ये (Navin Kumar) संघर्षाची नांदी दिसणार आहे. महाराणी वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आता तिसरा सीझन येत आहे. 


या वेब सीरिजचा ट्रेलर राणी भारती म्हणजेच हुमा कुरेशीपासून (Huma Qureshi) सुरू होतो. तिच्यावर पती, माजी मुख्यमंत्री भीमा भारतीच्या हत्येचा आरोप आहे. यानंतर महाराणी 3 च्या ट्रेलरमध्ये एकामागून एक सर्व पात्र दाखवण्यात आले आहेत. या वेब सीरिजमधील संवादही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहेत. 'कमजोर लोक बंदुका वापरतात, बुद्धिमान लोक त्यांच्या मेंदूचा वापर करतात, असा संवाद या ट्रेलरच्या अखेरीस आहे. 






'महाराणी' या वेब सीरिजमध्ये सुरुवातीपासूनच बिहारच्या राजकारणाच्या पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. या सीझनमध्ये राजकीय कुरघोडींसह त बनावट देशी दारुंमुळे लोकांच्या मृत्यूचा मुद्दाही दाखवण्यात आला आहे. 


बिहारच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या वेब सीरिजमध्ये हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत आहे. गृहिणी आणि अल्पशिक्षीत असणाऱ्या महिलेला अचानकपणे तिच्या पतीच्या गैरहजेरीत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यातून राणी भारती राजकारणाचे डावपेच शिकते, लोकांसाठी राजकारण असावे, स्वच्छ राजकारणाचा आग्रह धरणाऱ्या राणी भारतीसमोर अनेक संकटांची मालिका उभी राहते. 


कधी आणि कुठे होणार रिलीज?  Maharani 3  Release date 


महाराणी-3 वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  7 मार्च पासून ही वेबी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


 


वेब सीरिजमध्ये कोणते कलाकार?


या वेबी सीरिजमध्ये हुमा कुरेशीशिवाय, सोहम शाह, अमित सियाल, कनी कुसरुती, अनुजा साठे, प्रमोद पाठक, नेहा चौहान, तनू विद्यार्थी, सुशिल पांडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. महाराणीच्या तिसऱ्या सीझनचे दिग्दर्शन सौरभ भावे याने केले आहे. सुभाष कपूर आणि नंदन सिंह यांनी लेखन केले आहे.