Koffee With Karan 8 Promo Ranveer Singh Deepika Padukone : सिने-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम प्रेक्षक पाहू शकतात. 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हजेरी लावणार आहेत. 


'कॉफी विथ करण 8'चा प्रोमो आऊट! (Koffee With Karan 8 Promo Out)


'कॉफी विथ करण 8'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर रणवीर सिंह आणि दीपिकाची मजा घेताना दिसत आहे. करण जोहर आपल्या शैलीत दीपिकाला विचारतो,"रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील रॉकी रंधावाला डेट करायला आवडेल का?". यावर उत्तर देत दीपिका म्हणते,"मी रॉकी रंधावासोबत लग्न केलं आहे". त्यानंर करण जोहर अभिनेत्रीला विचारतो,"रणवीर व्यतिरिक्त तुझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री कोणासोबत चांगली आहे". याचं उत्तर देत अभिनेत्री हृतिक रोशनचं नाव घेते. दीपिका आगामी 'फायटर' या सिनेमात रणवीरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यानंतर रणवीर सिंह खुलासा करत म्हणतो की,"2015 मध्ये माझा दीपिकासोबत साखरपुडा झाला होता". यावर हसत अभिनेत्री म्हणते,"अॅडव्हान्स बुकिंग". सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 






'या' दिवशी सुरू होणार 'कॉफी विथ करण 8'


'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम 26 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. या कार्यक्रमात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहसह आलिया भट्ट, करीना कपूर खान, अजय देवगन आणि रोहित शेट्टी हे सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. 'कॉफी विथ करण 8'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


गप्पागोष्टी, रॅपिड फायर अन् बरचं काही...


'कॉफी विथ करण 8'बद्दल बोलताना करण जोहर म्हणाला,"तुम्ही सर्व मंडळी 'कॉफी विथ करण 8'ची आतुरतेने वाट पाहत आहात याचा आम्हाला अंदाज आहे. 'कॉफी विथ करण'च्या सातही सीझनला तुम्ही डोक्यावर घेतलं आहे. आता तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या आणखी मजेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी तुमच्याप्रमाणे मीदेखील खूप उत्सुक आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये तुम्हाला गप्पागोष्टी, रॅपिड फायर आणि मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे". 


संबंधित बातम्या


Koffee With Karan 8 : आयकॉनिक काऊच ते ऑरेंज मग; करण जोहरने दाखवली 'कॉफी विथ करण 8'ची झलक; पाहा व्हिडीओ