Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच करण जोहरने एक व्हिडीओ शेअर करत या कार्यक्रमाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. व्हिडीओमधील आयकॉनिक काऊच ते ऑरेंज मग अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


'कॉफी विथ करण 8' हा वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम 26 ऑक्टोबरपासून डिज्ना प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. करण जोहरने आता 'कॉफी विथ करण 8'च्या सेटवरील एक बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे.  


करण जोहरने शेअर केला व्हिडीओ (Karan Johar Shared Koffee With Karan 8 BTS Video)


करण जोहरने 'कॉफी विथ करण 8'चा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"कॉफी विथ करण 8'च्या जगाची एक झलक पाहा". या व्हिडीओमध्ये डिझाइन, प्लॅनिंग अशा अनेक गोष्टी दिसत आहेत. तसेच व्हिडीओमधील आयकॉनिक काऊचने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शानदार हँपरसह 'कॉफी विथ करण 8'चा ऑरेंज मगदेखील दिसत आहे. 






गप्पागोष्टी, रॅपिड फायर अन् बरचं काही...


'कॉफी विथ करण 8'बद्दल बोलताना करण जोहर म्हणाला,"तुम्ही सर्व मंडळी 'कॉफी विथ करण 8'ची आतुरतेने वाट पाहत आहात याचा आम्हाला अंदाज आहे. 'कॉफी विथ करण'च्या सातही सीझनला तुम्ही डोक्यावर घेतलं आहे. आता तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या आणखी मजेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी तुमच्याप्रमाणे मीदेखील खूप उत्सुक आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये तुम्हाला गप्पागोष्टी, रॅपिड फायर आणि मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे". 


'कॉफी विथ करण 8'मध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. 'कॉफी विथ करण 8'ची थीम कौटुंबिक सदस्य असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक जोड्या या पर्वात सहभागी होतील. 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया भट्ट, रणवीर सिंह, शाहरुख खान, रोहित शेट्टी, रणबीर कपूर, अजय देवगनसह अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.


संबंधित बातम्या


Koffee With Karan 8: करण जोहरनं केली 'कॉफी विथ करण-8' ची घोषणा; शेअर केला मजेशीर व्हिडीओ