Odisha Trian Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasore) येथील रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारोंच्या घरात लोक गंभीर जखमी आहेत. या अपघाताच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओडिशामध्ये झालेल्या या रेल्वे अपघातावर सलमान खान (Salman Khan), सोनू सूदसह (Sonu Sood) ज्युनियर एन्टीआरपर्यंत (Jr NTR) अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. 


सलमान खानने ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. त्याने लिहिलं आहे,"अपघाताबद्दल ऐकून खरच खूप वाईट वाटलं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे". 






सनी दोओलने लिहिलं आहे,"ओडिशातील बालासोर येथील भीषण रेल्वे अपघाताबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. या रेल्वे अपघातात आपला जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती दु:ख व्यक्त करतो. तसेच जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतो". 






दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरने शोक व्यक्त करत लिहिलं आहे,"या रेल्वे दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात मी आधार देणार आहे". अभिनेता सोनू सूदनेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. 






विराट कोहलीने ट्वीट करत लिहिलं आहे,"ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींवर लवकरात लवकर उपचार व्हावेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी".






संबंधित बातम्या


हावडा एक्प्रेस आधी मालगाडीला धडकली; त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसवर मालगाडी आदळली... ओडिशा रेल्वे अपघाताची संपूर्ण कहाणी