Sehar Shinwari On IND vs BAN:  भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हायव्होल्टेज सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा  पराभव केला. आता भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) हा सामना उद्या (19 ऑक्टोबर) पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium) येथे होणार आहे. या सामन्याच्या आधी  पाकिस्तानीअभिनेत्रीनं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून या अभिनेत्रीनं बांगलादेशमधील मुलांना एक ऑफर दिली आहे.


सेहर शिनवारीचं ट्वीट


पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीनं (Sehar Shinwari) नुकतेच एक ट्वीट शेअर केले आहे. तिच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, "इंशाअल्लाह, माझे बंगाली बंधू पुढच्या सामन्यात आमचा बदला घेतील. जर त्यांचा संघ भारताला पराभूत करू शकला तर मी ढाका येथे जाईन आणि बंगाली बॉयसोबत फिश डिनर डेटला जाईन"  


बांगलादेशची राजधानी ढाका येथे जाऊन सेहर शिनवारी ही बंगाली बॉयसोबत फिश डिनर डेट  करु शकेल की नाही? याकडे अता अनेकांचे लक्ष लागले आहे. अनेक नेटकऱ्यांनी सेहरच्या या ट्वीटला कमेंट करुन तिला ट्रोल देखील केलं आहे. 






कोण आहे सेहर शिनवारी?


सेहर शिनवारी ही नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असते. सेहर ही अनेकवेळा क्रिकेट संदर्भात ट्वीट शेअर करते.   तिने 2014 मध्ये  कॉमेडी मालिका "सैर सवा सैर" मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर 2015 मध्ये तिने मॉर्निंग शो होस्ट केला.


टीम इंडियाने वर्ल्ड कप-2023 मधील पहिले तीनही सामने जिंकले आहेत. आता भारतीय संघाला पुढील सामने बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहेत.  भारत (India) विरुद्ध बांगलादेश या पुण्यात होणाऱ्या वर्ल्ड कपच्या सामन्याकडे सध्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


India vs Bangladesh : टीम इंडियाची चिंता वाढली! भारत-बांगलादेश सामन्याआधी मोठी अपडेट, स्टार खेळाडूनं दुखापतीवर केली मात