Ekda Yeun Tar Bagha Teaser Out:  महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांची फौज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये कॉमेडीचा तडका बघायला मिळत आहे.


'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला एका हॉटेलची झलक दिसते. नंतर अभिनेते गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) हे या हॉटेलच्या  चालक आणि मालकांची माहिती देतात. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या टीझरमध्ये गिरीश कुलकर्णी,  प्रसाद खांडेकर,नम्रता संभेराव, तेजस्विनी पंडित,ओंकार भोजने आणि विशाखा सुभेदार  यांची झलक दिसते.  'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे, असा अंदाज या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.


प्रसाद खांडेकरनं 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "माझा लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. 'एकदा येऊन तर बघा,' या आमच्या नव्या कोऱ्या हॉटेलचे इरसाल चालक आणि मालक यांची ओळख करून द्यायला घेऊन आलो आहोत.हा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर!" प्रसाद खांडेकरनं शेअर केलेल्या टीझरला कमेंट करुन अनेकांनी प्रसादला त्याच्या या आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


पाहा टीझर:






'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटामध्ये वनिता खरात, पंढरीनाथ कांबळे, भाऊ कदम आणि  सायाजी शिंदे हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 'एकदा येऊन तर बघा' या  चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत.  गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात दिसणार नव्या भूमिकेत; लूकनं वेधलं लक्ष