Nia Sharma: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या हटके आऊटफिटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या अभिनेत्रीचे हटके लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...
निया शर्माचा हटके लूक (Nia Sharma Look)
अभिनेत्री निया शर्मानं खास लूकमध्ये एका बर्थडे पार्टीला हजेरी लावली. नियाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नियाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती ब्लॅक आऊटफिट, हातात ब्लॅक बॅग आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
निया शर्माच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "हिच्या समोर तर उर्फी पण फेल" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "असाच ट्रेलर उर्फीनं घातला होता, तेव्हा तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं."
पाहा निया शर्माचा लूक
जाणून घ्या निया शर्माबद्दल (Who Is Nia Sharma)
निया शर्मा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. निया शर्मानं 'काली- एक अग्निपरीक्षा' या 2010 मधील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'जमाई राजा' या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.'खतरों के खिलाडी' आणि 'झलक दिखला जा' या कार्यक्रमांमध्ये देखील तिनं सहभाग घेतला होता. निया ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. निया शर्माला इन्स्टग्रामवर 7.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: