Jackie Shroff Neena Gupta Mast Mein Rehna Ka : प्रत्येक आठवड्यात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रदर्शित होत असतात. अशातच आता अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) 'मस्त में रहने का' (Mast Mein Rehne Ka) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहेत. या सिनेमात ते नीना गुप्तांसोबत (Neena Gupta) स्क्रीन शेअर करताना दिसतील. 'मस्त में रहने का' हा विनोदी सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


नीना गुप्ता (Neena Gupta) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) या दोघांनीही हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवली आहे. पण आता 'मस्त में रहने का' या सिनेमाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. एकटे राहणाऱ्या दोन म्हाताऱ्यांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. शेवटी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. 


'मस्त में रहने का'चा ट्रेलर आऊट! (Mast Mein Rehne Ka Trailer Out)


'मस्त में रहने का'चा ट्रेलर आज 4 डिसेंबर 2023 रोजी आऊट झाला आहे. या सिनेमात अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. दोन लोकांचं आयुष्य या सिनेमात उलगडेल. जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांची गोड केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे चाहते आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.






'मस्त में रहने का' कधी होणार रिलीज? (Mast Mein Rehne Ka Release Date)


'मस्त में रहने का' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विजय मौर्यने सांभाळली आहे. या सिनेमात नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, राखी सावंत मुख्य भूमिकेत आहेत. मोनिका पनवार आणि अभिषेक चौहान या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विजय मौर्यनेच या सिनेमाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


'मस्त में रहने का' या सिनेमाबद्दल बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या,"प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला आवडतं. पण प्रत्येकवेळी असं होत नाही. या सिनेमाची गोष्ट ऐकल्यानंतर मी प्रभावित झाले आणि लगेचच होकार कळवला. या सिनेमाच्या माध्यमातून जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम करता आलं. प्रेक्षकांना आमची केमिस्ट्री आणि सिनेमा आवडेल, अशी आशा आहे. प्राईम व्हिडीओवर 240 देशांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे". 


संबंधित बातम्या


Khalnayak Reunion Moment: माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ एकाच फ्रेममध्ये; नेटकरी म्हणाले, "खलनायक-2..."