Netflix Launches New Website : पूर्वी मनोरंजनासाठी प्रेक्षकांना खास सिने-नाट्यगृहात जावे लागत असे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मने यावर तोडगा काढत क्रांती घडवून आणली. ओटीटी प्लॅटफॉर्म हा मनोरंजनाचा एक उत्तम पर्याय आहे. कोरोनाकाळात ओटीटी माध्यमाचे महत्त्व लोकांना पटलं आहे. लॉकडाउनमुळे लोकं घरात बंदिस्त होते. अशावेळेस ओटीटी माध्यम हा सर्वोत्तम पर्याय ठरला होता. नेटफ्लिक्स आता प्रेक्षकांसाठी अनोळखे राहिलेले नाही. नेटफ्लिक्सवर सर्व प्रकरच्या कथानकांचा समावेश असतो. नेटफ्लिक्स प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.


लोकप्रिय सिनेमे आणि वेबसीरिज पाहण्यासाठी नेटफ्लिक्स कंपनीने नवीन वेबसाइट लॉन्च केली आहे. कंपनी या वेबसाइटच्या माध्यमातून प्रेक्षकांना सर्वाधिक पाहिले जाणारे सिनेमे आणि वेबसीरिजची माहिती पोहोचवणार आहे. 


प्रत्येक आठवड्यातील ट्रेडिंग सिनेमांची आणि वेबसीरिजची यादी या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. सिनेमा, वेबसीरिज असे वेगवेगळे भाग केले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीची गोष्ट पाहणं अधिक सोयीस्कर ठरणार आहे. साइटच्या निवडलेल्या विभागात तुम्ही कोणती वेबसीरिज किंवा सिनेमा पाहू शकता हे कळेल. 


नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा आगामी सिनेमा


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) आगामी धमाका (Dhamaka) सिनेमा 19 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमातील कलाकार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. कार्तिक आर्यनचा 'धमाका' चित्रपट हा कोरियन चित्रपट 'द टेरर लाइव'चा हिंदी रिमेक असणार आहे. कार्तिक यात अर्जुन पाठक या नावाजलेल्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट भारतीय पत्रकारितेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले असून रॉनी स्क्रूवाला यांनी याची निर्मीती केली आहे.


संबंधित बातम्या


Aishwarya Rai - Abhishek Bachchan Post For Aaradhya : आराध्या बच्चनला अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


Mike Tyson ने लायगर सिनेमाच्या सेटवर चावला Ananya Panday चा कान


Kangana Ranaut : 'दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते स्वातंत्र्य नाही'; कंगना पुन्हा बरळली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha