एक्स्प्लोर
संजय दत्तच्या पार्टीत रात्री दोन वाजता पोलिसांची एंट्री

मुंबई: जवळजवळ तीन वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगून नुकताच जेलमधून बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय दत्तमुळे त्याच्या शेजाऱ्यांना पोलिसांना पाचारण करावं लागल्याचं वृत्त समजतं आहे. एका इंटरटेनमेंट वेबसाइटच्या वृत्तानुसार संजय दत्तच्या घरात बराच गोंधळ सुरु होता. त्याच्या घरातून प्रचंड आवाज येत होता. तसंच घरामध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवणं सुरु होता. रात्री उशीरापर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यामुळे वैतागलेल्या त्याच्या शेजाऱ्यांनी अखेर पोलिसांना पाचारण केलं. संजयच्या घरी काही कारणानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी रात्री 2 वाजेपर्यंत सुरु होती. त्यानंतर संजयच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन त्याबाबत तक्रार केली.
Before You Go
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव






















