एक्स्प्लोर

प्रेग्नन्सीमुळे अभिनेत्री नेहा धुपियाचं घाई-गडबडीत लग्न?

नेहा धुपिया गर्भवती असल्यामुळे तिने दोन वर्षांनी लहान असलेल्या अंगद बेदीसोबत लगीनगाठ बांधली, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया गेल्याच आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकली. कोणताही गाजावाजा न करता, लग्न झाल्यानंतरच नेहाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जाहीर केले. त्यामुळेच तिच्या चारित्र्याविषयी भलते-सलते प्रश्न सोशल मीडियावर निर्माण केले जात आहेत. नेहा धुपिया गर्भवती असल्यामुळे तिने दोन वर्षांनी लहान असलेल्या अंगद बेदीसोबत लगीनगाठ बांधली, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेहाचे वडील प्रदीप धुपिया यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'नेहा लग्नाआधी गरोदर असल्याच्या वृत्तात जरासंही तथ्य नाही. कामाच्या डोंगरामुळे नेहा आणि अंगद यांना लग्नासाठी फार वेळ देता येत नव्हता. त्यामुळे घाई गडबडीत तारीख ठरवून दोघांचं शुभमंगल पार पाडलं.' असं प्रदीप धुपिया सांगतात. अभिनेत्री नेहा धुपिया गुपचूप बोहल्यावर, दोन वर्ष लहान अंगदशी लग्न 'नेहा आणि अंगद चांगले मित्र आहेत, हे आम्हाला माहित होतं. आपल्याला लग्न करायचं आहे, हे ते दोघं कधी सांगतात, याचीच आम्ही वाट पाहत होतो. त्यांनी निर्णय घेताच, आम्ही पालकांनीही लगेच संमती दिली' असंही नेहाच्या वडिलांनी सांगितलं. नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी 10 मे रोजी दिल्लीत विवाहबंधनात अडकले होते. अंगद आणि नेहाने शीख पद्धतीने विवाह केला. नेहा धुपिया 37 वर्षांची आहे, तर अंगद तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान म्हणजेच 35 वर्षांचा आहे. यामुळेच सोशल मीडियावर दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं. ‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच विद्या बालनसोबत ती ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात झळकली होती. अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. अंगद बेदीनेही काही चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget