Neeyat trailer:  अभिनेत्री   विद्या बालनच्या (Vidya Balan)  नीयत (Neeyat) या चित्रपटाचा टीझर काल प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल आहे. या ट्रेलरमधील विद्याच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


नीयत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की,  मिस्टर कपूर नावाच्या एका व्यक्तीनं एका पार्टीचं आयोजन कलं आहे. या पार्टीमध्ये मिस्टर कपूरनं अनेक जवळच्या व्यक्तींना आमंत्रित केलं आहे. अशातच पार्टीमध्ये सर्वजण डान्स करतात. अचानक पार्टीमधील लोकांना कळते की, मिस्टर कपूरचा मृत्यू झाला आहे. मिस्टर कपूर यांच्या मृत्यूचा तपास करण्याची जबाबदारी मिराला देण्यात येते. मिराची भूमिका विद्या बालननं साकारली आहे.


ट्रेलरमध्ये पुढे दिसते की, विद्या म्हणजेच मिरा ही पार्टीमधील लोकांना सांगते की मिस्टर कपूर यांचा मर्डर झाला आहे. त्यानंतर मिरा ही पार्टीमध्ये आलेल्या सर्व लोकांची चौकशी करत असते.  या चौकशीमध्ये तिला अनेक रहस्यांबाबत कळतं. आता विद्या ही मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करेल का? मिस्टर कपूर यांचा मर्डर कोणी केला? या प्रश्नांची उत्तरं  'नीयत' या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहेत.  


विद्यानं सोशल मीडियावर नीयत चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आम्ही खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे. आता तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे.'


पाहा ट्रेलर






नीयत चित्रपटाची स्टार कास्ट


विद्याशिवाय नीयत या चित्रपटात राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा, प्राजक्ता कोळी, शशांक अरोरा  हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  विक्रम मल्होत्रा ​​यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विद्याच्या नीयात चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. नीयत हा चित्रपट Glass Onion: A Knives Out Mystery या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे. 7 जुलै रोजी नीयत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.







वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Neeyat First Look: 'नीयत' चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज; विद्या बालनच्या लूकनं वेधलं लक्ष