Neeyat First Look: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  विद्या बालन (Vidya Balan) ही तिच्या अभिनायनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. भूल भूलैय्या, कहानी या विद्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विद्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच विद्याचा  'नीयत' (Neeyat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. 


विद्यानं सोशल मीडियावर नीयत या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर शेअर केला आहे. यामधील विद्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. नीयत हा एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित सिनेमा असणार आहे. नीयत चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन विद्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ही आहे मीरा राव, क्लासिक मर्डर मिस्ट्रीचा नॉट सो क्लासिक डिटेक्टिव्ह. नीयत 7 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.'






विद्यानं नीयत चित्रपटाचा टीझर देखील विद्यानं शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, रहस्य आणि विविध हेतूंचे जग तुमच्या भेटीस येणार आहे. 






विद्याच्या नीयात चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. विद्याशिवाय या चित्रपटात राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा, प्राजक्ता कोळी, शशांक अरोरा  हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  विक्रम मल्होत्रा ​​यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 


नीयत चित्रपटात विद्या ही एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे.  याआधी 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'बॉबी जासूस' या चित्रपटात विद्यानं डिटेक्टिव्हची भूमिका साकारली होती.  चार वर्षांपासून विद्याचा एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. 2019 मध्ये तिचा 'मिशन मंगल' हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिचा एकही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला नाही. आता विद्या ही  नीयत या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Vidya Balan: बॉलिवूडची 'शेरनी' आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या विद्या बालनच्या संपत्तीबाबत