Neena Gupta : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या 'पंचायत 3' (Panchayat 3) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज करण्यात येणार आहे. याआधी या सीरिजचे दोन्ही सीझन हिट झालेले आहेत. आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. सीरिजमधील मंजू देवींची भूमिका चांगलीच गाजली. नीना गुप्ता यांनी ही भूमिका साकारली आहे.  अभिनेत्रीने आता आपल्या करिअरवर भाष्य केलं आहे. नीना गुप्ता यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. अभिनेत्रीने आता आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा देत व्यथा मांडली आहे. एकेकाळी अभिनेत्रीवर 'विद्रोही स्टार' आणि 'बोल्ड अभिनेत्री' असे टॅग लावले गेले होते.


नीना गुप्ता यांचं फिल्मी करिअर खूप मोठं आहे. 1982 पासून त्या इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहेत. आज त्या स्टार अभिनेत्री असल्या तरी करिअरचे सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी खूप कठीण होते. नुकतचं 'पंचायत 3'च्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या,"मुंबईत आल्यानंतर तीन महिन्यांतच मायानगरी सोडावी असं मला वाटत होतं. मी दिल्लीहून आल्याने मुंबईत राहायला मला त्रास होत होता. माझं शिक्षण झालेलं होतं. त्यामुळे पुन्हा दिल्लीत जाऊन पीएचडी करावी असं मला वाटत होतं. मुंबई मला कधी जवळ करणार नाही, असं मला वाटत होतं". 


पैशांसाठी केल्या बी-ग्रेड भूमिका : नीना गुप्ता


नीना गुप्ता पुढे म्हणाल्या,"काहीतरी काम मिळेल या आशेने मी मुंबईत दिवस  काढत राहिले. करिअरच्या सुरुवातीला पैशांची खूप गरज होती. पैशांसाठी बी-ग्रेड भूमिका कराव्या लागल्या. देवाकडे प्रार्थना की हे चित्रपट कधीही रिलीज होऊ नये. पण आज एखादी भूमिका करायची की नाही हे मी ठरवू शकते. पण करिअरच्या सुरुवातीला मिळेल ते काम करत होते". 


बोल्ड अभिनेत्रीचा टॅग


नीना गुप्ता यांना बोल्ड अभिनेत्रीचा टॅग लावण्यात आला आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,"बोल्ड अभिनेत्री' असं लोक का म्हणतात हे मला माहिती नाही. मी साधेसरळ, स्ट्रॉन्ग, ग्लॅमरस अशा अनेक भूमिका केल्या आहेत. मीडियाने माझी एक इमेज तयार केली आहे. 'सिंगल मदर' असूनही माझ्याबद्दल असं बोललं जातं. माझे निधन झाल्यावर 'बोल्ड नीना गुप्ता नहीं रहीं' अशा बातम्या प्रसिद्ध होऊ शकतात. पण आता या गोष्टींचा विचार करणं मी सोडलं नाही. मला याचा फरक पडत नाही".


संबंधित बातम्या


Panchayat Season 3 : 'पंचायत-3' मधील कथानकात काय असणार? रिलीज आधीच समोर आली अपडेट