Panchayat Season 3 : वेब सीरीज 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याची रिलीज डेट आता जवळ येऊ लागली आहे. 'पंचायत-3' च्या (Panchayat Season-3) रिलीज आधीच यंदा सीझनमधील नव्या कथानकात काय असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी 'पंचायत-3' चा ट्रेलर लाँच करण्यात आला. त्यानुसार, आता फुलेरा गावात सरपंच पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिसून येणार आहे. 'पंचायत-3' बद्दल दिग्दर्शक दीपक मिश्राने काही गोष्टी उघड केल्या आहेत.
दिग्दर्शक दीपक मिश्राने एका मुलाखतीत पंचायत-3 मध्ये काय असणार यावर भाष्य केले आहे.
'पंचायत-3' मध्ये खास काय असणार?
'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक दीपक मिश्राने सांगितले की, लोकांना पात्र माहीत आहेत. पण आता त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार आहे. चंदन हा साधा मुलगा आहे हे लोकांना माहीत आहे, पण कोणतीही नवीन परिस्थिती उद्भवली तर तो कसा आणि काय वागेल हे नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. सचिवजी गावातील प्रकरणात जेवढे इन्वॉल्व होत आहेत, तेवढे फसत चालले आहेत. त्याच वेळी त्यांच्या कॅटच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. प्रधान जी आणि प्रल्हाद यांचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील. या सर्व गोष्टी या सीझनमध्ये अगदी ताज्या आणि नवीन आहेत आणि त्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत असे दीपक मिश्राने सांगितले.
सचिवजींना लागली उत्सुकता...
'पंचायत'मध्ये सचिवची भूमिका साकारणारा जितेंद्र कुमारने सांगितले की, मी तिसऱ्या सीझनबद्दल खूपच उत्सुक आहे. पहिल्या आणि सीझनचा स्पेस मेंटेन ठेवत आता सीरिजचे कथानक पुढे सरकले आहे. गावातील इतर गोष्टी दाखवले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये लोकांनी जे प्रेम दिले, तेच प्रेम उत्साह आम्हाला तिसऱ्या सीझनमध्येही मिळेल असे जितेंद्र कुमारने सांगितले.
'पंचायत'चा तिसरा सीझन 28 मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, सान्विका, रघुबीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक आणि अशोक पाठक असे अनेक कलाकार या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. आता फुलेरा गावात यावेळेस काय वेगळे होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
पंचायत-3 च्या ट्रेलरमध्ये काय?
ट्रेलरची सुरुवात सचिवजींच्या गावात परतण्याने होते. बदली रद्द होऊन अभिषेक त्रिपाठी फुलेरा गावात परतला आहे. सचिवजी देखील गावच्या राजकारणाचा हिस्सा होणार नाही ना अशी शंका बनकरसच्या मनात उपस्थित होते. याला निमित्त ठरते ते केंद्र सरकारची आवास योजना. त्यावरून आता गावातील राजकारणाला फोडणी मिळणार आहे.
पंचायतच्या या सीझनमध्ये बनरकस वेगळाच डाव खेळणार आहे. त्याला आमदाराचा पाठिंबा असून प्रधानजींचा (सरपंच) पराभव करून सत्ताबदल करायचा आहे. या साऱ्या खेळातून सचिवजी आणि प्रधानजी यांचे कुटुंब कसे बाहेर पडते, फुलेरात काय धमाल होणार हे या सीझनमध्ये दिसून येईल