Nayak 2 Announcement : सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडवणाऱ्या सिनेमाची घोषणा करण्यात आलीये. 2001 साली अनिल कपूर (Anil Kapoor) मुख्य भूमिकेत असलेला नायक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी या सिनेमानं बॉलीवूड सिनेमाला एक नवं वळण देखील दिलं होतं. आता पुन्हा एकदा तसंचं काहीसं वातावरण निर्माण करुन देणाऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आलीये. नायक-2 (Nayak 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
धडाडीचे निर्णय घेऊन राजकीय वातवरण किंबहुना सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न अनिल कपूरने या चित्रपटात केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता नायक-2 मध्ये कोणता पॉलिटीकल ड्रामा पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलीये. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद नायक-2 या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याची माहिती देखील समोर आलीये. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं कास्टिंग सध्या सुरु आहे. त्यामुळे या चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत दिसणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिलीये.
अनिल कपूर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार?
नायक या सिनेमात अनिल कपूरने एक दिवसाचा मु्ख्यमंत्री अशी भूमिका साकारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच आशयाची या सिनेमाची गोष्ट असल्याच अनिल कपूरचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार का याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. त्याचप्रमाणे नायक -2 या सिनेमात एक वेगळा पॉलिटीकल ड्रामा पाहायला मिळणार असल्याचं पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
या कलाकारांची चित्रपटात लागणार वर्णी?
वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, टॅक्सी नंबर 9211 आणि कच्छे धागे यांसारख्या अनेक भेटीला आलेला मिलन लुथारिया या चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान या चित्रपटात रजत अरोरा देखील पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी मिलन आणि रजतची जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची गोष्ट, यातील कलाकार या सगळ्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच हा चित्रपटात कधीपर्यंत सिनेमागृहांत येणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आहे.