Vidya Balan Pratik Gandhi :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची जादू चालवल्यानंतर अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. रोमँटिक कॉमेडी फिल्म  'दो और दो प्यार'चा टीझर आज लाँच करण्यात आला.या चित्रपटात विद्या बालन प्रेमाच्या झांगडगुत्त्यात अडकणार का? हे लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहे.  या चित्रपटात विद्या बालनसह इलियाना डिक्रूज, प्रतिक गांधी (Pratik Gandhi) आणि सेंथिल राममूर्ती आदींच्या भूमिका आहेत. आज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. 


'दो और दो प्यार'चा टीझर मजेशीर आहे. दोन जोडपी आपल्या नात्यांमध्ये स्पार्क कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कधी ते डेटवर जातात तर कधी एकत्र प्रवास करतात. लग्नानंतर सुरुवातीला जे आकर्षण होते ते कसेतरी परत मिळवण्याचा प्रयत्न असतो.


'दो और दो प्यार'च्या टीझरमध्ये काय आहे?


पुरस्कार विजेते ॲड फिल्ममेकर शिर्षा गुहा ठाकुरता यांचा  'दो और दो प्यार' हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये चारही स्टार्स तुम्हाला रोमँटिक अंदाजात दिसतात. सेंथिल आणि विद्या हे जोडपे आहेत आणि इलियाना आणि प्रतिक एकत्र आहेत. दोन्ही जोडप्यांची कहाणी वेगळी आहे. त्यांची लव्हस्टोरी चांगली चालली आहे.मात्र, प्रतिक आणि विद्या एकत्रितपणे बेडवर दिसतात, त्यानंतर काय घडतं हे चित्रपट पाहिल्यावर समजेल. 






'दो और दो प्यार'चा टीझर खूपच मजेशीर आहे. यामध्ये तुम्हाला विद्या आणि सेंथिलमधील उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळेल. तर विद्यासोबत प्रतिक गांधीच्या केमिस्ट्रीचीही झलक पाहायला मिळेल. या चित्रपटात इलियाना डिक्रूझ अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. प्रतिक गांधी हा मध्यमवर्गीय व्यक्तीरेखा साकारत आहे. आता या सर्वांना प्रेमात काही सरप्राईजसोबतच काही गोंधळही दिसणार आहे. या चौघांच्या नात्यात निर्माण झालेली गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. 


चित्रपटाच्या टीझरमध्ये रोमान्स आणि इमोशनसह मजेशीर संवाद देखील आहेत. अप्लॉज एंटरटेन्मेंटसह एलिप्सिस एंटरटेन्मेंट प्रोडक्शन अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. 19 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.