एक्स्प्लोर
VIDEO : नवाझचा देसी स्वॅग, बाबुमोशाय बंदुकबाझचा टीझर रिलीज

मुंबई : बॉलिवूडमध्ये खणखणीत अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीचा नवा सिनेमा येत आहे. 'बाबुमोशाय बंदुकबाझ' या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे.
बदलापूर चित्रपटात नवाझचा दिसलेला भारतीय रांगडा अवतार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दीड मिनिटाच्या टीझरमध्ये नवाझुद्दीन चाहत्यांच्या मनावर छाप पाडून जातो.
कुशल नंदीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात नवाझ हा बाबू नावाच्या छोटेखानी काँट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी जेम्स बाँडच्या व्यक्तिरेखेपासून प्रेरणा घेतल्याचं नवाझने सांगितलं होतं.
नवाझसोबत दिव्या दत्ता, बिदिता बाग, मुरली शर्मा, जतिन गोस्वामी, श्रद्धा दास, अनिल जॉर्ज, जीतू शिव्हारे, भगवान तिवारी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
पाहा टीझर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
