एक्स्प्लोर

... म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनची निवड : संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे.

नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. पण बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीच का? याचे उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. संजय राऊत गुरुवारी सोनू निगम, महिना चौधरी आणि लेसले लेविस यांच्या भारतीय कला महोत्सवात सहभागी झाले होते. त्यावेळी राऊत यांनी या सिनेमाबद्दल अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली. सिनेमाविषयी सांगताना राऊत म्हणाले की, “पहिल्यांदा आम्ही सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला. हा ट्रेलरला 24 तासात 30 लाखापेक्षा जास्त पाहिला. आगामी काळात यात अजून वाढ होईल. या सिनेमाला संपूर्ण जगात चांगला प्रतिसाद मिळेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. thackeray बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी इतर कोणत्या कलाकारांच्या नावाचा विचार झाला का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, त्यांनी तात्काळ नकार दिला. “नाही... या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी या एकमात्र अभिनेत्याच्या नावाचीच चर्चा होती.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं असून, 23 जानेवारी 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल सोनू निगम म्हणाला की, “बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेसाठी ज्या अभिनेत्याची निवड झाली आहे, तो अभिनेता आपल्या देशातील शीर्ष अभिनेत्यांपैकी एक आहे. आणि जेव्हा एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या जीवनावर सिनेमाची निर्मिती होत असते. त्यावेळी त्याला वेगळी ओळख मिळते.” दरम्यान, या कला महोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल संजय राऊत यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच, “देशातील प्रमुख कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलेचं प्रदर्शन केलं. त्यांच्या कलागुणांना सर्वांनीच प्रोत्साहन दिलं  पाहिजे,” अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. सिनेमाचा ट्रेलर पाहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget