Navya Naveli Nanda : बॉलिवूडमधील स्टारकिड्स हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असतात. सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) हा त्याच्या द आर्चिज या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  पण बिग बींची  नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नव्या आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहेत. अशातच नव्यानं सिद्धार्थच्या 'खो गए हम कहां' (Kho Gaye Hum Kahan) या चित्रपटाच्या  स्क्रिनिंगला हजेरी लावली.


पापाराझीला पाहताच लाजली नव्या


बिग बींची नात नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांना  अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत.  नव्या नवेली नंदा तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदीच्या   'खो गये हम कहां' या आगामी चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. स्क्रिनिंगला आलेल्या नव्याचे फोटो पापाराझीनं काढले. पापाराझीला पाहताच नव्या लाजली. त्यामुळे आता नव्या आणि सिद्धार्थ यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 


'या' सेलिब्रिटींनी स्क्रिनिंगला लावली हजेरी


सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचा 'खो गये हम कहां' हा चित्रपट 26 डिसेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या  रिलीजच्या आधी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. 'खो गये हम कहां' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक स्टार्स पोहोचले होते. मात्र अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निखिल द्विवेदी, जन्नत जुबेर आणि 'खो गये हम कहां' चित्रपटाची स्टार कास्ट या सर्वांनी या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.


पाहा व्हिडीओ:






'खो गए हम कहां'  या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीनं या चित्रपटात  इमाद  ही भूमिका साकारली आहे. तर अहाना ही भूमिका  अनन्या पांडेनं साकारली आहे. तसेच नील ही भूमिका आदर्श गौरवनं साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. 
महत्वाच्या बातम्या : 


Siddhant Chaurvedi : सिद्धांत चतुर्वेदीनं शेअर केला शर्टलेस फोटो; बिग बींच्या नातीच्या रिअ‍ॅक्शननं वेधलं लक्ष