Siddhant Chaurvedi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. गली बॉय, गेहरांईया आणि बंटी और बबली या चित्रपटामधील सिद्धांतच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) आणि सिद्धांत यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असते. नुकताच सिद्धांतनं एक  शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला नव्यानं  दिलेल्या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 
 
सिद्धांत चतुर्वेदी शर्टलेस फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'आज ज्यादा, कल हम कम थे... मैंने तुम्हें तब देखा था, जब मुझे कोई नहीं देखता था. आज तुम हो और मैं भी यहां , और यह नजरें हम पर... आज ज्यादा, कल कम थे...', असं लिहिले आहे. सिद्धांतच्या या फोटोला नव्यानं लाइक केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 






सिद्धांत चतुर्वेदीचा बंटी और बबली 2 हा चित्रपट  19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्याच्या  गेहरांईया या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये सिद्धांतसोबतच दीपिका पादुकोण आणि अन्नया पांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली. 


महत्वाच्या बातम्या :