Sachin Pilgaonkar:  भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) नं चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं. चंद्रयान-3 हे चंद्रावर उतरल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्रोच्या  शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आता अभिनेते सचिन पिळगावकर  (Sachin Pilgaonkar)  यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं,  'चंद्रावर बसणारा पहिला भारतीय' . त्यांनी शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


अशी ही बनवाबनवी हा चित्रपट अनेकांचा ऑल टाइम फेवरेट चित्रपट आहे. या चित्रपटामधील गाणी, डायलॉग्स हे अनेकांना तोंडपाठ असतील. आता सचिन पिळगावकर यांनी अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील एका सीनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे चंद्रावर बसलेले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा फोटो शेअर करुन सचिन पिळगावकर यांनी  कॅप्शनमध्ये लिहिलं,  'चंद्रावर बसणारा पहिला भारतीय'


नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स


सचिन पिळगावकर यांनी शेअर केलेल्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'लय भारी सर' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'अजरामर कलाकृती म्हणजे.. बनवाबनवी.. सलग 365 दिवस पाहिला तरी कंटाळा येणार नाही आणि ज्याला येईल तो मराठी रसिक नाही.'



लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ,अश्विनी भावे, सचिन पिळगावकर, प्रिया बेर्डे  आणि सुप्रिया पिळगावकर या कलाकारांनी अशी ही बनवाबनवी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1988 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. अनेक प्रेक्षक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. या चित्रपटामधील कुणी तरी येणार गं,हदयी वसंत फुलताना या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट


अशी ही बनवाबनवी या चित्रपटाबरोबरच धूमधडाका, गडबड घोटाळा,दे दणादण, धडाकेबाज, आयत्या घरात घरोबा या  चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विशेष ओळख निर्माण केली होती. मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले.  त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत होती.लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 16 डिसेंबर 2004 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


संबंधित बातम्या


Ashi Hi Banwa Banwi : 'अशी ही बनवाबनवी'चे चाहते आहात? सिनेमाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात