एक्स्प्लोर
कोहली जगातला सर्वात वाईट वर्तन करणारा खेळाडू : नसिरुद्दीन शाह
विराट कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाजच नाही, तर सर्वात वाईट वर्तन करणारा खेळाडूही आहे. त्याचा उद्धटपणा आणि वाईट वर्तन हे निव्वळ त्याच्या क्रिकेटमधील हुकूमतीमुळे झाकोळलं जातं, असं नसिरुद्दीन शाह म्हणाले
मुंबई : इंग्लिश खेळाडू आवडत असणाऱ्या क्रिकेट चाहत्याला भारत सोडून जाण्याचा सल्ला देण्यावरुन भारताचा कर्णधार विराट कोहली ट्रोल झाल्याची घटना फार जुनी नाही. मात्र हे विराटचे ट्रोलर्स आता त्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. कारण यावेळी ट्रोलर्सनी आरोपीच्या पिंजऱ्यात दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना उभं केलं आहे. निमित्त ठरलं ते नसिरुद्दीन यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट.
'विराट कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाजच नाही, तर सर्वात वाईट वर्तन करणारा खेळाडूही आहे. त्याचा उद्धटपणा आणि वाईट वर्तन हे निव्वळ त्याच्या क्रिकेटमधील हुकूमतीमुळे झाकोळलं जातं. आणि देश सोडून जाण्याचे माझे कोणतेही विचार नाहीत.' अशी पोस्ट नसिरुद्दीन शाह यांनी सोमवारी सकाळी फेसबुकवर केली.
विराट कोहलीला उद्धट म्हटल्याने अनेक चाहत्यांचा तिळपापड झाला. अनेक नेटिझन्सनी नसिरुद्दीन शाह यांचा समाचार घेतला. कोणी 'ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हरवण्यासाठी हा अॅटिट्यूड आवश्यक असतो' असं म्हणत त्याची पाठराखण केली. तर कोणी परदेशातील खेळाडूंची उदाहरणं देत त्यांची तुलना विराट कोहलीशी केली.
काही जणांना मात्र नसिरुद्दीन शाह यांचे विचार पटले. विराट कोहली कितीही उत्तम खेळत असला, तरी त्याने वर्तन सुधारायला हवं, असं मत काही फेसबुक यूझर्सनी व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
करमणूक
राजकारण
Advertisement