एक्स्प्लोर

मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना पाटेकर

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनतर आज पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आपल्या वकिलाने कोणत्याही चॅनेलशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं आहे.

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनतर आज पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आपल्या वकिलाने कोणत्याही चॅनेलशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मी दहा वर्षांपूर्वीही स्पष्टीकरण दिलं होतं. 10 वर्षापूर्वी जे बोललो होतो तेच खरं आहे. त्यात आज काय बदल होणार आहे? असा सवालही नाना पाटेकरांनी विचारला आहे. माझ्या वकिलाने मला कोणत्याही चॅनेलशी बोलण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मी आता यावर काही बोलू इच्छित नाही. नाहीतर चार दिवस अगोदरच मी बोललो असतो. वेळ आल्यावर मी सगळ्यांशी एकत्र बोलेन, असंही नाना पाटेकरांनी स्पष्ट केलं आहे. काय आहे प्रकरण? बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण नुकतीच सांगितली. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री म्हणाली होती. 2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' हा सिनेमा गाजल्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीडसारखे काही सिनेमे केले. 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने यापूर्वीही नाना पाटेकरांबाबत घडलेला हा किस्सा अनेकवेळा सांगितला आहे. दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यानतंर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं. तनुश्री दत्ताचा आरोप अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे." 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. संबंधित बातम्या तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Urfi javed Slams Adnan Shaikh: 'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
Anuradha Paudwal on Personal Life: 25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
Alia Bhatt in Tumbad 2: 'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
Marathi TV Actress Madhavi Nimkar Becomes Businesswomen: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
Embed widget