Nana Patekar: हॉलिवूडमधील (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियोसोबत (Leonardo DiCaprio) काम करण्याचं स्वप्न अनेक कलाकारांचं असतं. सध्या बॉलिवूडमधील कलाकार हॉलिवूडमध्ये जात आहेत. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांसारख्या अभिनेत्रींनी बॉलिवूडबरोबच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली होती. पण बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी हॉलिवूड स्टार लियोनार्डो डिकॅप्रियोटच्या एका चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं (Anurag Kashyap) एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितलं होतं. 


अनुराग कश्यपनं सांगितला किस्सा


अनुराग कश्यपनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'हॉलिवूडचे दिग्दर्शक रिडले स्कॉट यांना त्यांच्या बॉडी ऑफ लाईज या चित्रपटात नाना पाटेकर यांना कास्ट करायचे होते, परंतु त्यांनी दहशतवाद्याची भूमिका करणार नाही', असे सांगून ही ऑफर नाकारली.  जेव्हा अनुराग कश्यपला विचारण्यात आले की त्याने नाना पाटेकरसोबत काम का केले नाही? यावर तो म्हणतो की, दोघांनी अनेकदा एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली आहे. 


अनुराग कश्यपनं पुढे सांगितलं "रिडले स्कॉटने द पूल चित्रपट पाहिला आणि मला एक ईमेल पाठवला. त्याला नाना पाटेकर यांना बॉडी ऑफ लाईजमध्ये मार्क स्ट्राँगच्या भूमिकेसाठी कास्ट करायचे होते. मी नाना पाटेकर यांच्या गेलो, त्यांना सांगितले की, रिडले स्कॉटला त्याच्या चित्रपटामध्ये तुम्हाला कास्ट करायचे आहे, त्यावर नानांनी उत्तर दिले," दहशतवाद्याची भूमिका आहे, करणार नाही." बॉडी ऑफ लाईज या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो यांनी प्रमुख भूमिका साकारली. हा  2008 मध्ये प्रदर्शित झालेला स्पाय थ्रिलर चित्रपट आहे.


नाना पाटेकर यांचे चित्रपट


नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयानं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्मिण केली.  नटसम्राट, डॉ प्रकाश बाबा आमटे या मराठी चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी काम केलं. तर वेलकम  बॅक,  तिरंगा, शक्ती, अंगार या हिंदी चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली. 


अनुराग कश्यपच्या सेक्रेड गेम्स या क्राइम थ्रिलर वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी त्याचा दो-बारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Anupam Kher On Anurag Kashyap : ‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्करला जाणार नाही म्हणणाऱ्या अनुराग कश्यपवर अनुपम खेर यांचा पलटवार, म्हणाले...