Nana Patekar Reject Body Of Lies Hollywood Movie : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या चर्चेत आहेत. 'बॉडी ऑफ लाइज' (Body Of Lies) या हॉलिवूड सिनेमासाठी त्यांना विचारणा झाली होती. पण त्यांनी या सिनेमाची ऑफर नाकारली. दहशतवाद्याची भूमिका कधीही साकारणार नाही, असं म्हणत त्यांनी आपला नकार कळवला होता.


'बॉडी ऑफ लाइज' हा हॉलिवूड सिनेमा 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या हॉलिवूडपटासाठी नाना पाटेकर यांना विचारणा झाली होती. रिडले स्कॉट यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. तर लिओनार्डो डिकॅप्रिओ आणि रसेल क्रो या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'बॉडी ऑफ लाइज' हा थरार, नाट्य असणारा सिनेमा होता.


मला अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही : नाना पाटेकर 


एका मुलाखतीत नाना पाटेकर यांना सलग हॉलिवूडपट नाकारण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देत नाना म्हणाले,"आजवर अनेक हॉलिवूड सिनेमांसाठी मला विचारणा झाली आहे. पण या सिनेमांना मी नकार देत आलो आहे. मला अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे इंग्रजी भाषेत संवादफेक करणं मला त्रासदायक वाटतं". 


नाना पाटेकर पुढे म्हणाले,"मला ज्या भूमिकांसाठी विचारणा झाली त्या माझ्यासाठी योग्य नव्हत्या. दहशतवाद्याची भूमिका मी कधीही साकारू शकत नाही. मी दहशतवाद्याची भूमिका केलेली माझ्या चाहत्यांनाही आवडणार नाही. लिओनार्डो डिकॅप्रिओच्या 'बॉडी ऑफ लाइज' या सिनेमातील दहशतवाद्याच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली होती. 


नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Nana Patekar Upcoming Movies)


नाना पाटेकर लवकरच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा कोरोनाकाळावर भाष्य करणारा आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वेलकम 3' (Welcome 3) या आगामी सिनेमासाठी नानांना विचारणा न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमात नाना पाटेकर यांच्यासह पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन आणि अनुपम थेर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नाना पाटेकर यांनी आजवर एकापेक्षा एक सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता त्यांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Nana Patekar : देशाच्या विरोधात बोलणारी मंडळी खूप आहेत; नाना पाटेकरांनी नेत्यांना फटकारलं