एक्स्प्लोर

Tanushree Dutta's sexual harassment case | नाना पाटेकरांना क्लीन चिट

'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला होता. मात्र पोलिसांनी नाना यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लीन चिट दिली आहे. 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने गेल्या वर्षी केला होता. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांबदद्ल पोलिसांनी 15 जणांचे जबाब नोंदवून घेतले, पण त्यापैकी एकानेही दशकभरापूर्वी झालेल्या या कथित लैंगिक छळाला दुजोरा दिला नसल्याची माहिती आहे. अभिनेत्री डेझी शाहचीही या 15 जणांमध्ये चौकशी झाली होती. मात्र तनुश्रीने वर्णन केलेल्या घटनेशी साधर्म्य साधणारा जबाब कोणीही नोंदवला नाही, असं 'बॉलिवूडलाईफ.कॉम' या वेबसाईटवरील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तनुश्रीचे सवाल 'ज्या 15 जणांचे जबाब नोंदवण्यात आले, ते कोण होते? ते माझ्या बाजूने होते की नानाच्या? ते नानाचे मित्र होते. मग ते माझी बाजू उचलून का धरतील? माझा छळ झाल्याचं सिद्ध करायला मला कोणत्याही साक्षीदारांची गरज नाही. अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयात सत्य सिद्ध करणं काही वेळा कठीण असतं. पोलिसांनी चौकशीत प्रचंड चालढकलपणा केला. त्यांनी ज्यांचे जबाब नोंदवले, त्यापैकी बऱ्याच जणांनी माझा छळ होताना पाहूनही मला पाठिंबा दिला नाही. मग आता ते माझ्या बाजूने का बोलतील? गुन्हेगारांचं रक्षण करुन स्त्रीला खोटं ठरवण्याची अशा लोकांची मानसिकता असते' असं उत्तर नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर तनुश्रीने 'मिड-डे'शी बोलताना दिलं. 'ज्यांना माझ्या बाजूने बोलण्याची इच्छा आहे, त्यांना नाना पाटेकरांच्या माणसांकडून धमक्यांचे फोन येत आहेत. साक्षीदारांना त्यांचा खरा जबाब नोंदवण्यासाठी तयार करायला आम्हाला खूप अडचणी आल्या.' असा आरोपही तनुश्रीने केला आहे.

काय आहे प्रकरण?

'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर 2008 साली अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला होता. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला होता. तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री म्हणाली होती. VIDEO | मुंबई | जे खोटं आहे, ते खोटंच आहे,' तनुश्रीच्या आरोपांवर नानांचं उत्तर तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. डेझी शाह 'त्या' दिवशी सेटवर 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी छेडछाड केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 2008 साली त्या गाण्याच्या चित्रीकरणाच्यावेळी डेझीदेखील सेटवर उपस्थित होती. तनुश्रीने नानांवर आरोप केल्यांनातर डेझीने माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी डेझीला पोलिस ठाण्यात बोलावलं होतं. काय म्हणाली होती डेझी? 'तेव्हा मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करत होते. मी तनुश्रीला काही डान्स स्टेप्स शिकवत होते. सुरुवातीचे दोन दिवस सर्व काही सुरळीत सुरु होते. परंतु तिसऱ्या दिवशी अचानक काहीतरी झाले. तनुश्री खूप धक्क्यात असल्याचं आम्ही सर्वांनी पाहिलं. नेमकं काय झालं होतं, हे मला माहीत नाही, परंतु मी तनुश्रीच्या सोबत आहे.' असं डेझी म्हणाली होती. कोण आहे तनुश्री दत्ता? 2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' हा सिनेमा गाजल्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीडसारखे काही सिनेमे केले. 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने यापूर्वीही नाना पाटेकरांबाबत घडलेला हा किस्सा अनेकवेळा सांगितला आहे. नाना पाटेकरांची बाजू काय? दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर उत्तर देणं नाना पाटेकर यांनी टाळलं होतं. जे खोटं आहे, ते खोटं आहे, असं म्हणत मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचं नाना पाटेकर म्हणाले. तर तनुश्री दत्ताच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही, असं दिग्दर्शक राकेश सारंग यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असंही तनुश्री म्हणाली होती.
संबंधित बातम्या
तनुश्रीच्या तक्रारीनंतर नाना, सारंग, आचार्य, सिद्दीकींवर गुन्हा
मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना पाटेकर 
तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग  
राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता
तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया
तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला
बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget